संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद भीमा कोरेगावला विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणार.

भिमपँथरर मा. राजेश गवळी यांची माहिती.

मुंबई(प्रतिनिधी) असीम शौर्याचे प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद हे भीमा कोरेगाव मध्ये येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मानवी अधिकारांसाठी लढल्या गेलेले जगातील एकमेव युद्ध म्हणजे भीमा कोरेगावचे महान युद्ध होय.जुलमी अन्यायी अत्याचारी आणि बुरसटलेल्या मनुवादी विचारसरणीच्या विषमतावादी पेशव्यांच्या सुमारे २८००० हजार हत्यारबंद सैनिकांना , कोणत्याही प्रकारची शस्त्रासमुग्री नसतानाही केवळ स्वाभिमानासाठी आणि स्वअस्तित्वा साठी फक्त ५०० ( पाचशे ) महार वीरांनी १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावात पराभूत केले.आणि जुलमी पेशवाईचा नायनाट करून समतेची गुढी उभारली.ह्या युद्धाने मानवाला मानवाचे अधिकार मिळवून देण्यासाठी जगभरातील स्वतंत्रप्रिय समुदायाला लढण्याची प्रेरणा मिळाली , एक नवं बळ मिळाले. ह्या लढाईने वंचित-शोषित-पीडित-सर्वहारा समूहाला स्वबळाची प्रखरतेने जाणीव झाली.महान शूरवीर सेनापती सिदनाक महार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या ह्या महान लढाईचे साद पडसाद गेल्या २०० वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या संघर्षात उमटले आहेत साक्षात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ह्या क्रांतदर्शी युद्धाने प्रभावित झाले होते ,आणि ज्या महान पूर्वजांनी आपल्या मूक समाजाच्या पायातील गुलामीचे जखडबंद तोडून टाकले , ज्या एका एका महान समतावादी पूर्वजांनी छपन्न छपन्न विषमतावादी पेशवाई सैनिकांना कापून काढले ,त्या महान शूरवीर पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी स्वतः बाबासाहेब भीमा कोरेगावात दरवर्षी१ जानेवारी रोजी यायचे.हीच महान परंपरा आंबेडकरी समाजाने सुरू ठेवली असून , लाखोंच्या संख्येने हा आंबेडकरी समाज आपल्या महान पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावात येत असतो.यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमांचे पुर्णतः पालन करीत भीम आर्मीचे संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद हे स्वतः भीमा कोरेगावात येणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले की , भाई चंद्रशेखर आझाद हे भीमा कोरेगावाला जाण्याच्या आधी करोडो लोकशाहिवाद्यांची उर्जाभूमी असणाऱ्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून मुंबईत आंबेडकरी बालेकिल्ल्यात आंबेडकरी समाजाच्या भेटीसाठी धावता दौरा करून थेट भीमा कोरेगावला प्रयाण करतील.त्यानंतर संध्याकाळी पुण्यात चंद्रशेखर आझाद हे राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचे बौद्धिक शिबीर ( कॅडर कॅम्प ) घेतील आणि रात्री तिथेच पुण्यात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी २ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता देहूरोड येथील बुद्धविहाराला भेट देऊन तथागत बुद्धांना वंदन करतील त्यानंतर ते तळेगाव दाभाडे येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानाला भेट देऊन कलंबोली मार्गे उल्हासनगर भिवंडी ह्या मार्गाने प्रयाण करण्याची शक्यता असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट