
संगम येथे पशुसंवर्धन व लाळया खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर संपन्न
सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन
- by Reporter
- Dec 26, 2020
- 1196 views
परळी वैजनाथ(प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे संगम येथे पशुसंवर्धन व लाळया खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांच्या माध्यमातून आज शनिवार दि.26 डिसेंबर रोजी संपन्न झाले.
संगम येथे पशुसंवर्धन शंभर गाय, बैल, म्हैस,यांच्या कानात बिल्ले मारण्याचा उपक्रम व लाळ्या खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर आज शनिवार दि.26 डिसेंबर रोजी शेतकर्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी डॉ. पि.एल.आघाव यांंनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन लाभले.परळी जवळील संगम येथे पशुसंवर्धन उत्साहात संपन्न झाले. गावातील शेतकर्यांनी आपआपली गाय, बैल, म्हैस हनुमान मंदिरासमोर जनावरे घेऊन प्रत्येक जनावरांच्या कानात बिल्ले मारल्ले.संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांच्या पुढाकारातुन शिबिर आयोजित करण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पि.एल.आघाव यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. काळदाते व डॉ. ज्योतिबा मुंडे,बोंडारे व गावातील शेतकरी यांनी परिश्रम घेतले व यशस्वी शिबिर केले असल्याचे सरपंच कोकाटे यांनी या वेळी सांगण्यात आल्या असल्याचे सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी सांगितले व सर्व डॉक्टर टिमचे व शेतकरी बांधवांचे आभार अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मानले.
रिपोर्टर