साखर कारखान्याच्या वजन काट्यात तफावत वाटत आसल्यास शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात
तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारखानदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू - भाई मोहन गुंड
- by Reporter
- Dec 26, 2020
- 690 views
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये गळीत जवळपास सहा कारखाने चालू आहेत एक दीड महिन्यापासून ऊसाचे गाळप चालू आहे जिल्ह्यातील साखर कारखाने हे राजकीय पुढाऱ्याचे आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला वाटते आपला ऊस पटकन गाळपला जावा यासाठी संबंधित कारखानदारांच्या बगलाला असणाऱ्या पुढाऱ्याच्या हाताशी धरून गाळण देत आहेत मात्र कारखान्याच्या ऊस वजन काट्यावर वजनात तफावत असल्याच बोलले जात आहे,शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास कारखानदार ऊस नेणार नाही या भीतीपोटी शेतकरी समोर येत नाही, काट्याच्या माध्यमातुन शेतकर्यांची लुट होऊ नये या मुळे साखरसहसंचालक औरंगाबाद जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली सबंधीत विभागाचे वैद्यमापन निरिक्षक,लेखा परिक्षक क्षेणी१ साखर, पो निरिक्षक, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारा एक कार्यकर्ता प्रतिनिधी म्हणून भरारी पथकात समावेश करुन पथक तयार केले आहे, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, जिल्ह्यातील साखर कारखान्यात वजना संदर्भात काही शेतकऱ्यांना संशय वाटत असेल तर त्यांनी लेखी तक्रार करावी त्यांचे नाव गुप्त ठेवून संबंधित भरारी पथक कारखान्याला भेट देऊन तपासणी करेल काट्यामध्ये कसूर आढळून आल्यास संबंधित साखर कारखानदारांवर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू असे शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी पत्रक काढुन आवाहन केले आहे.
रिपोर्टर