खा. मनोज कोटक यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये रक्तदान शिबिर

मुलुंड:(शेखर भोसले) भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तसेच ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा गटनेते व मुलुंड पूर्व प्रभाग क्र १०६ चे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि २५ डिसेंबर रोजी मराठा मंडळ सभागृह, मुलुंड पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदात्यांनी यावेळी उस्फुर्त प्रतिसाद करून हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात हातभार लावला.

संबंधित पोस्ट