मुलुंडमध्ये जेष्ठ नागरिक स्नेह संमेलन संपन्न

मुलुंड:(शेखर भोसले) शिवसेना पुरस्कृत अभिजीत चव्हाण प्रतिष्ठान आयोजित जेष्ठ नागरिक स्नेह संमेलन कार्यक्रमात मा. खासदार संजय दिना पाटील ह्यांच्या हस्ते १३५ जेष्ठ नागरिकांना लोकरीची शाल भेट देण्यात आली मुलुंड पूर्व येथील नानेपाडात 
दि २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत कमलाकर चव्हाण ह्यांनी केले होते. 

मा खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झालेल्या या कार्यक्रमास मधुकर म्हात्रे, बाळा घरात, अप्पा साळवी, लता चोपा, सीताराम खांडेकर, चंद्रकांत शेलार, भालेश म्हात्रे, समीर वैती, नरेश म्हात्रे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नानेपाडा मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट