
वढू बुद्रुक मध्ये भीम आर्मीने मनुस्मृती आणि मोदीस्मृतीचे जाहीर दहन केले.
भीम आर्मीच्या वतीने राज्यभर महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा.
- by Reporter
- Dec 25, 2020
- 1006 views
मुंबई(प्रतिनिधी) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत देहावर निधड्या छातीने अंतिम संस्कार करणारे महाराष्ट्राचा मर्द गोविंद गोपाळ बाबा यांच्या महान स्मृतीला साक्षी मानून आज वढू बुद्रुक येथे भीम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे आणि भीम आर्मीचा दबंग शेर सितारामजी गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृतीचे जाहीर दहन करण्यात आले. ह्या सोबतच शेतकरी विरोधी आणि अंबानी-अदानी सारख्या उद्योगपती धार्जिने कृषी विधेयक बिलाचे अर्थात मोदीस्मृतीचे सुद्धा जाहीर दहन करण्यात आल्याची माहिती भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.सदरहू कार्यक्रमात पुणे जिल्हा मुख्य महासचिव महेश कुलकर्णी यांचेसह अविनाशजी गायकवाड आणि भीम आर्मीचे असंख्य कार्यकर्ते , रणरागिणी उपस्थित होत्या.
ह्यावेळी भीम आर्मीच्या वतीने अशोकभाऊ कांबळे तसेच सितारामजी गंगावणे यांनी जाहीर मागणी केली की स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या धन्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या गोविंदबाबांच्या स्मारकाची अत्यंत दुरावस्था असून ह्या स्मारकाला ऐतिहासिक वारसा म्हणून राष्ट्रीय स्मारक घोषित करून ह्या स्मारकाची व्यवस्थित देखभाल करण्यात यावी.अन्यथा भीम आर्मीला संवैधानिक लढा उभारावा लागेल , असा इशारा दिल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
त्याचबरोबरर भीम आर्मी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मा.दत्तूभाई मेढे यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण महाराष्ट्रात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी ९४ वा महिला मुक्ती दिन विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा केला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून समतावादी भारताची निर्मिती केली.मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या रूपाने भिमस्मृती निर्माण करून ह्या देशातील करोडो महिलांना , वंचित-शोषित-पीडित-सर्वहारा वर्गाला त्यांचा मूलभूत अधिकार आणि न्याय मिळवून दिला , सर्व भारतीयांना समानतेचा दर्जा मिळवून दिल्याची भावना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी व्यक्त करतानाच आज संपूर्ण भारतीयांवर भारतीय संविधानाच्या रक्षणाची महान जबाबदारी येऊन पडली असून , ह्या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनीच कटिबद्ध राहूया असेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.
रिपोर्टर