श्री गगनगिरी महाराज दत्तजयंती उत्सव २०२० श्री क्षेत्र गगनगड गगनगिरी आश्रमाचे भाविकांना आवाहन!!

मुंबई :  सांप्रत सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे यावर्षी नेहमीप्रमाणे होणारा श्री दत्तजयंती उत्सव होणार नाही. या संदर्भात संस्थानच्या  वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, परमपूज्य गगनगिरी आश्रम, किल्ले गगनगड, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर  येथे दि. २८ व २९ डिसेंबर या दरम्यान संपन्न होणारा श्री दत्तजयंती उत्सव होणार नसून या दिवशी दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तांनी आपापल्या घरी राहूनच श्री गगनगिरी महाराजांची पूजा अर्चना करावी व सर्व परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी श्री गगनगिरी महाराजांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करावी  असे आवाहन स्वामी गगनगिरी महाराज, किल्ले गगनगड आश्रमाचे व्यवस्थापक श्री.  बापूसाहेब पाटणकर व विश्वस्त श्री. रमेशराव माने यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट