संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद १ जानेवारी रोजी भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार.

भिमपँथर मा.राजेश गवळी यांची माहिती.

मुंबई (प्रतिनिधी) १ जानेवारी हा दिवस तमाम भारतीयांच्या काळजात कोरलेला महान ऐतिहासिक दिवस.ह्याच दिवशी गुलामीचे प्रतीक असणारी विषमतावादी जुलमी पेशवाई शूरवीर महार सैनिकांनी १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावच्या घनघोर युद्धात नामशेष केली.केवळ  पाचशे महार योद्ध्यांनी पेशव्याच्या सुमारे अठ्ठावीस हजार सैनिकांना भीमा कोरेगावच्या मातीत पराभूत करून , विकृत पेशवाईला कायमचे गाडले.ह्याचा सार्थ अभिमान उराशी बाळगून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावात उभारलेल्या शौर्यस्तंभाला मानवंदना देऊन आपल्या शूरवीर महान पराक्रमी पूर्वजांना अभिवादन करायचे , तीच प्रथा अखंडपणे आंबेडकरी जनतेने सुरू ठेवत दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगावात लाखोंच्या संख्येने जमून आपल्या पूर्वजांना मानवंदना देत आहेत.

आपल्या महान पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी भीम आर्मीचे संस्थापक , संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद हे सुमारे दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगावात आले होते.ह्यावेळी सुद्धा ते १ जानेवारी २०२१ रोजी भीमा कोरेगावात  महान पूर्वजांना अभिवादन करणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे प्रमुख राजुभाई झनके यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यप्रभारी मा.दत्तूभाई मेढे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथे झालेल्या बैठकीत भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नियोजित दौऱ्याची आखणी करून भाईंच्या दौऱ्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून , त्यानुसार भाई चंद्रशेखर आझाद हे १ जानेवारी रोजी पुण्यात येऊन भीमा कोरेगावला जाणार असून संध्याकाळी महाराष्ट्र राज्यभरातून आलेल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचे बौद्धिक शिबीर ( कॅडर कॅम्प ) घेतील. तेथून ते २ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे जिल्हा अंतर्गत भिवंडी शहर भीम आर्मी कार्यालयाचे उदघाटन करून तेथेच ते रोड शो करीत मुंबई चैत्यभूमीच्या दिशेने रवाना होतील.भिवंडी ते चैत्यभूमी अश्या रस्त्यावर जागोजागी काही ठिकाणी भाई चंद्रशेखर यांचा ताफा थांबून कार्यकर्त्यांकडून होणारा सत्कार स्वीकारत भाई चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमीवर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांस अभिवादन करतील अशीही माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता कोअर कमिटी प्रमुख राजुभाई झनके , माजी राज्यप्रमुख नेहाताई शिंदे , माजी मुख्य महासचिव मनिषभाऊ साठे , माजी महासचिव सिताराम गंगावणे आणि माजी कोशाध्यक्षा मंगलाताई गायकवाड तसेच इतर सन्माननीय अश्या सदस्यांची दहा सदस्यीय आयोजन समिती नेमली असून ह्या समितीचे मार्गदर्शक म्हणून राज्यप्रभारी दत्तूभाई मेढे आणि केंद्रीय सदस्य अशोकभाऊ कांबळे हे असणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करून राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून , त्यांच्याशी चर्चा करून भाई चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्रातील दोन दिवसीय दौरा समाप्त होईल , असेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.हा दौरा प्रचंड स्वरूपात यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांनी , पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे जाहीर आवाहन आयोजन समितीने केले आहे.

संबंधित पोस्ट