मनसेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता , शिवाजी पार्क मैदान परिसर फटाकेंच्या आवाजाने दणाणले

    मनसेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता , शिवाजी पार्क मैदान परिसर फटाकेंच्या आवाजाने दणाणले

 मुंबई - दिवाळीत सर्वोच्च न्यायालयाने ठराविक वेळेत २ तास फटाके फोडा असा आदेश दिला होता. मनसेने शिवाजी पार्क मैदानात फटाके फोडून या नियमांचे उल्लंघन केले आहे. मनसेच्यावतीने शिवाजीपार्कवर दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी संध्याकाळी ८ वाजण्याच्या आधीच फटाके फोडण्यात आले.अनेक वर्षांपासून मनसेच्यावतीने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सव साजरा केला जातो. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी फटाके फोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये वेळेचे बंधन घातले आहे. उद्यापासून दिवाळी सुरु होते. आम्ही दिवाळीच्या आधी फटाके फोडले. महाराष्ट्रात धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होते. सुप्रीम कोर्टाने कधी दिवाळी साजरी होते आणि कधी संपते हे सांगितले नाही, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले.

काय सांगतो सुप्रीम कोर्टाचा नियम -
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता. या निर्णयात फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, फटाक्यांच्या विक्रीसाठी काही अटीदेखील लागू करण्यात आल्या आहेत. फटाक्यांची ऑनलाइन विक्री केली जाऊ शकत नाही, असेही कोर्टाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहे. तसेच केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपलेली असताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे.  
वायू प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात फटाक्यांचे उत्पादन-विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२३ ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण निर्णय दिला.  
दिवाळी साजरी करा, पण या वेळेतच फटाके फोडा. दिवाळी दरम्यान फटाक्यांच्या धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून देण्यात आली आहे. संध्याकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत.





रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट