भुसावळ मध्ये भीम आर्मीचे विराट शक्तिप्रदर्शन,हजारो कामगारांनी भीम आर्मी मध्ये केला जाहीर प्रवेश.

मुंबई (प्रतिनिधी) ऐतिहासिक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मध्ये रविवारी २० डिसेंबर रोजी भीम आर्मी प्रदेश कोअर कमिटी आणि माजी राज्य कमिटी यांची संयुक्तपणे राज्यस्तरीय आढावा बैठक झाली.महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.दत्तूभाई मेढे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कोअर कमिटी प्रमुख राजुभाई झनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ह्या बैठकीला केंद्रीय सदस्य अशोकभाऊ कांबळे , माजी मुख्य महासचिव मनिषभाऊ साठे , माजी महासचिव सिताराम गंगावणे , माजी महासचिव सुनीलभाऊ गायकवाड , माजी राज्य प्रवक्ते रमाकांतजी तायडे , माजी मुख्य संघटक दिपकभाऊ भालेराव , माजी उपाध्यक्ष राहुल मीनाक्षी वाघ , कोअर सदस्य संजयजी बोपेगावकर , माजी महासचिव अविनाशजी गायकवाड , मध्य प्रदेशचे ऍड.विजयजी मेढे , कोअर सदस्य प्रा.शरदजी केदारे आणि भीम आर्मीचे प्रचार प्रसारक भिमपँथर मा.राजेश गवळी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.ह्या अतिशय यशस्वी ठरलेल्या बैठकीचे आयोजन जळगाव जिल्हा कमिटी , जिल्हाप्रमुख गणेशभाई सपकाळे आणि माजी राज्य प्रवक्ते रमाकांतजी तायडे यांनी केले होते.ह्या बैठकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिपनगर औष्णिक केंद्रातील सुमारे साडे चार हजार कामगारांनी रमाकांत तायडे आणि गणेशभाई सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मी मध्ये जाहीर प्रवेश केला.ह्या सर्व कामगारांचे राज्य प्रवक्ते दत्तूभाई मेढे , कोअर कमिटी प्रमुख राजुभाई झनके आणि केंद्रीय सदस्य अशोकभाऊ कांबळे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिका आणि निळी शाल देऊन स्वागत करण्यात आल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

भीम आर्मीच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण राज्यस्तरीय आढावा बैठकीत संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांच्या १ जानेवारी २०२१ रोजीच्या नियोजित भीमा कोरेगाव दौऱ्याची आखणी करून भीम आर्मीच्या पुढील वाटचाली संदर्भात अत्यंत सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

ह्या बैठकीला यशस्वी करण्यासाठी रमाकांतजी तायडे , गणेशभाई सपकाळे यांचेसह जिल्हा मुख्य महासचिव श्रीकांतभाई वानखेडे , जिल्हा सचिव सुपडूभाऊ संदानशिव , प्रचार-प्रसिद्धी प्रमुख व जामनेर तालुकाप्रमुख प्रबुद्ध खरे , मुख्य संघटक विक्रमभाई प्रधान , भुसावळ तालुकाप्रमुख विजयभाई मालवीय , यावल तालुकाप्रमुख हेमराजभाई तायडे , जामनेर शहरप्रमुख अक्षयजी सुरडकर ,  बोदवड तालुकाप्रमुख सुरेशजी इंगळे , पाचोरा तालुकाप्रमुख वीर तुसंबळ यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट