
मेट्रो कारशेडसंदर्भातील सौनिक समितीच्या अहवाल मिळण्यासाठी डॉ. किरीट सोमैयांनी राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांकडे केली अपिल दाखल!
- by Reporter
- Dec 21, 2020
- 1107 views
मुंबई : मेट्रो आरे कार शेड संबंधात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर 2019 मध्ये श्री. मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली. समितीने आपला अहवाल जानेवारी, 2020 मध्ये राज्य सरकारला सुपूर्त केला.
या समितीने कार शेड कांजुरमार्ग येथे न हलविता आरे येथे ठेवावे असे सांगितले असल्याचे म्हंटले जात आहे.
भाजप नेते डॉ. किरीट सोमैया गेले दोने महिने मुख्यमंत्री कार्यालय व नगरविकास कार्यालय येथे या रिपोर्टसाठी माहितीचा अधिकार अंतर्गत पाठपुरावा करीत आहेत. दि. 16 डिसेंबर, 2020 रोजी मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य संबंधित अधिकारी यांनी डॉ. किरीट सोमैयांची मनोज सौनिक समिती रिपोर्टसाठीची अपिल नामंजूर केली व रिपोर्ट देण्यासंबंधी आदेश देण्याचे नाकारले.
यासंबंधात डॉ. किरीट सोमैया यांनी आज आपले अपिल मुख्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयात दाखल केली आहे.येत्या काही दिवसात या अपिलाची सुनावणी होणार.
ठाकरे सरकार श्री. मनोज सौनिक समितीचा अहवाल प्रकाशित करायला का भीत आहे? असा प्रश्न डॉ. किरीट सोमैया यांनी केला आहे.
रिपोर्टर