घाटकोपरच्या स्वामी समर्थ मठाचे कलशारोहन
- by Reporter
- Dec 21, 2020
- 1464 views
मुंबई(प्रतिनिधी) : घाटकोपर पूर्व पंतनगर विभागातील श्री स्वामी समर्थ मठात कलशारोहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला.तीन दिवस सूरु असलेल्या या भव्य कार्यक्रमात गणेश पूजन,देवता पूजन,सत्यनारायणाची महापूजा,हवन, आरती,कीर्तन,भजनासह विविध
कार्यक्रमांच आयोजन सामजिक अंतर राखत करण्यात आल होत.या कार्यक्रमासाठी सिध्दिविनायक मंदिराचे अध्यक्ष/राज्यमंत्री आदेश बांदेकर,विभागप्रमुख राजेंद्र राऊत आमदार पराग शहा,मा.आमदार प्रकाश मेहता,नगरसेविका राखी जाधव उपविभागप्रमुख संजय दरेकर,प्रकाश वाणी,सचिन भांगे आदी मान्यवर उपस्थित होते,मठाच्या वतीने सर्वांचा सम्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत किरण प्रभू,राजेश म्हामुणकर,रमेष पांडे गोविंद वाळ्के यांनी केले.कलशारोहन कार्यक्रमासाठी शाहिर रमेश ह्डपी कलामंच प्रस्तुत गजर स्वामींचा या विशेष संगीतमय वाध्यवृंदाचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीत सर्व कार्यक्रम छान प्रकारे पार पडले.

रिपोर्टर