
विक्रोळीतील रवींद्रनाथ टागोर उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न
- by Reporter
- Dec 21, 2020
- 942 views
मुलुंड:(शेखर भोसले)विक्रोळीतील टागोर नगर येथील रवींद्रनाथ टागोर उद्यानाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि १८ डिसेंबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. यावेळी शिवदर्शिकेचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
विक्रोळीतील नागरिकांच्या सोयीसाठी रवींद्रनाथ टागोर उद्यानाचे नूतनीकरण महापालिकेमार्फत नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या सुचनेनुसार करण्यात आले. गेले काही महिने या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम चालू होते. सर्व सुखसुविधांयुक्त, सुसज्ज अश्या या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने दि.१८ डिसेंबर रोजी या उद्यानाचा लोकार्पण खासदार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी स्थानिक आ. सुनील राऊत, भांडूपचे आ. रमेश कोरगांवकर, मा.महापौर दत्ता दळवी, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा चंद्रावती मोरे, नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेविका दिपमाला बढे, नगरसेविका राजेश्वरी रेडकर, विभाग संघटिका संध्या वढावकर, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, उपविभाग संघटिका रश्मी पहुडकर व आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर