मुलुंडचे शशिकांत मोकळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हा सचिवपदी नियुक्ती

मुलुंड: (शेखर भोसले) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हा सचिवपदी मुलुंडचे शशिकांत मोकळ यांची नियुक्ती पक्षश्रेष्ठींच्या संमतीने ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष धनंजय पिसाळ यांच्या आदेशाने दि १९ डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल मुलुंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी आपण मेहनत घेणार असून पक्षाच्या वाढीसाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवून पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवणार असून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे शशिकांत मोकळ यांनी आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना सांगितले.

संबंधित पोस्ट