घाटकोपर मध्ये शिवराजचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

मुंबई : महाराष्ट्रात जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरता यावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार घाटकोपर पूर्व पंतनगर मधील शिवराज मंडळाने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला दिसून आला,या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेतला,या शिबीरात शिवसेना उपविभाग्प्रमुख संजय दरेकर,माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी,विजय चपटे,सचिन भांगे,राजावाड़ी रुग्णालय रक्तपेढीच्या समाजविकास अधिकारी अश्विनी लोहार आदी सहभागी झाले होते

मंडळाचे अध्यक्ष/माजी नगरसेवक सुरेश गोलतकर,कैलास गोसावी,दिलीप पूरव,दिनेश फाटक यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी खुप मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट