म्हाडाचे घराचे कोटीचे उड्डाणे; ग्रँट रोडवरील घर ५.८० कोटींना

      मुंबई : म्हाडाने यंदाच्या लॉटरीमध्ये मुंबईतील विविध ठिकाणच्या 1 हजार 384 घरांचा समावेश केला असून ही लॉटरी 5 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार आहे. तर 16 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. यंदाच्या लॉटरीतील ग्रँट रोडमधील कंबाला हिल धवलगिरी भागात उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. या ठिकाणी प्रत्येकी 965 चौरस फुटांची दोन घरे असून एका घराची किंमत 1, 2 नव्हे तर चक्क 5 कोटी 80 लाख इतकी आहे. ही घरे म्हाडाच्या लॉटरीच्या इतिहासातील आजवरची सर्वात महागडी घरे ठरणार आहेत. याआधी लॉटरीत 1 कोटीच्या सर्वाधिक किमतीच्या घराचा समावेश होता. अत्यल्प उत्पन्न गटासाठी लॉटरीमध्ये सर्वाधिक कमी किमतींची 14 लाख 61 हजारांची घरे आहेत. अ‍ॅन्टॉप हिल वडाळा येथे 278 घरे, प्रतीक्षानगर सायन 89, गव्हाणपाडा, मुलुंड 269, पी.एम.जी.पी. मानखुर्द 316, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.) 24, महावीरनगर, कांदिवली (प.) 170, तुंगा, पवई 101, मुंबई इमारत दुरुस्ती व मंडळद्वारे प्राप्त 50 घरे, विकास नियंत्रण विनियम 33(5) अंतर्गत प्राप्त 19 आणि
विखुरलेली 68 घरे आहेत.

  • अत्यल्प उत्पन्न गट 20 लाख आणि त्यापेक्षा कमी,
  • उत्पन्न गटानुसार घरांची विक्री किंमत
  • अल्प उत्पन्न गट 20 ते 35 लाखपर्यंत,
  • मध्यम उत्पन्न गट 35 ते 60 लाखपर्यंत
  • उच्च उत्पन्न गट 60 लाख आणि त्यापेक्षा जास्त.

सोमवार 5 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. 10 डिसेंबर ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे. 16 डिसेंबरला वांद्रे (पू.) येथील म्हाडा मुख्यालयामध्ये ही सोडत निघणार आहे. लॉटरीतील घरांच्या किमती या नवीन धोरणानुसार कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात आपले हक्काचे घर घेण्याची संधी या लॉटरीच्या माध्यमातून मिळणार असल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 63, अल्प उत्पन्न गटासाठी 926, मध्यम उत्पन्न गटासाठी 201 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 194 घरांचा समावेश आहे. बांधकाम चालू असलेली 1 हजार 112 घरे असून 272 विखुरलेली घरे आहेत. यांपैकी रेरा प्रमाणपत्र प्राप्त 1 हजार 112 घरे, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त 263 घरे आणि भोगवटा कार्यवाही प्रगतीपथावर असलेली 9 घरे आहेत.

सुमारे पाच वर्षांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळातील तुंगा पवई येथील घराची किंमत 1 कोटी होणार असे म्हणताच सर्वांचेच डोळे पांढरे झाले होते.त्यामुळे ही घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याची म्हाडाची हिंमतच झाली नव्हती. मात्र शेवटी ही घरे पडून राहिल्याने घरांच्या किमती कमी करत ती लॉटरीत आणली. त्यानंतर गेल्या वर्षी सर्वात महाग 1 कोटी 95 लाखात घर विकल गेलेे. मात्र यंदा दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला लॉटरीसाठी मिळालेल्या घरांची किंमत थेट 5 कोटी 80 लाखांच्या घरात गेली आहे.

पहिल्यांदाच मुंबई मंडळाकडून दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडसारख्या परिसरातील घराचा समावेश होतो आहेे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मात्र या घराला शंभर पेक्षा जास्त अर्जदार येतील, असा दावा केला आहे. ही दोन्ही घरे खूप मोठे असून खासगी विकासकाच्या घराच्या तुलनेत कितीतरी पटीने स्वस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच म्हाडाने नुकत्याच घरांच्या किमती कमी केल्या आहेत. त्यानुसार लॉटरीसाठी दुरुस्ती मंडळाकडून मिळणार्‍या घरांच्या किमतीही कमी केल्या आहेत. दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या उच्च उत्पन्न गटातील घरे रेडिरेकनरच्या 70 टक्के दराने विकली जाणार आहे. त्यानुसार या घरांची किंमत 5 कोटी 80 लाख इतकी आली आहे. अन्यथा हे घर 8 कोटीमध्ये विकावे लागले असते, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.









रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट