
बोगस नोंदित सोसायटयांकडून फसवणूक करीत मेंटेनन्स वसुली,शासनाकडून कारवाई शून्य
- by Reporter
- Dec 03, 2020
- 1071 views
मुंबई(दीपक शिरवडकर) - सहकारी हौसिंग सोसायटयांचे पदाधिकारी मनमानी करत दर महिन्याला सभासदांच्या माथी अवाच्या सवा मेंटेनन्स मागतात.त्यांच्या या लुटमारीला आत चाप बसणार आहे.
एखाद्या हौसिंग सोसायटीकडून जादा मेंटेनन्स आकारला जात असल्याची तक्रार सभासदाने केल्यास उपनिबंधकाने त्याची शहानिशा करून वाढीव वसूल रक्कम संबंधितांना परत करण्याचे आदेश द्यावेत असे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. कायदेशीररीत्या नोंदित हौसिंग सोसायटयां मेंटेनन्स वसूल करू शकतात.परंतु वसई-विरार उपप्रदेशात खोटया-बोगस कागदपत्राने अनधिकृत बांधकामा ठिकाणी हौसिंग सोसायटया नोंद झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार?जिल्हा हौसिंग फेडरेशनही बोगसरित्या नोंदित हौसिंग सोसायटयांना सभासदत्व कसे देते ही मोठी समस्या आहे.
सर्वसमावेशक समान दराने मेंटेनन्स खर्च वसूल केला जावा असे मा.सहकार न्यायालय मा.सहकार अपिलीय अधिकारी व मा.उच्च न्यायालय यांचे आदेश असून सदनिकेच्या आकारमानानुसार चौरस फुटानुसार मेंटेनन्स खर्च वसूल करणे बेकायदा आहे असे असताना वसई-विरार पालिका क्षेत्रात खोटया-बोगस दस्ताने व अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी उपनिबंधक-सहकारी संस्था,वसई यांनी दुर्लक्षितपणा करीत बेकायदेशीररित्या नोंदणी करून दिलेल्या हौसिंग सोसायटया मनमानी करीत सभासदांची फसवणूक करीत आहेत. उपनिबंधक कार्यालयास ह्या साऱ्या गोष्टी माहीत असूनही कारवाई करण्याएैवजी दुर्लक्षितपणा केला जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
रिपोर्टर