डोंगरी:माथाडी नेत्यांची स्मृती चिरंतन ठेवा -शिरवडकर

मुंबई(प्रतिनिधी) - महापालिका "बी" विभागास सामाजिक सांस्कृतिक,कामगार चळवळीची एक मोठी परंपरा आहे अशा या डोंगरी उमरखाडी-वाडिबंदर परिसरातील कामगार चळवळीतील महासुरींच्या कार्याची भावी पिढीला प्रेरणा मिळावी याकरता पालिका "बी" विभागातील अनुक्रमे ठाणा स्ट्रीट, पुना स्ट्रीट, कल्याण स्ट्रीट, क्लाईव्ह रोड,एलफिन्स्टन क्रॉस लेन,सूरत स्ट्रीट या मार्गांना अनुक्रमे माथाडी कामगार नेते कै.अँड.काशिनाथ वळवईकर,शिवाजीराव पाटील, बाबुराव रामिष्टे,माजी महापौर, कामगार नेते राजाभाऊ चिंबुलकर,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानी कामगार नेते अँड एकनाथ जोशी,माजी महापौर व आमदार सालेहभाई अब्दुल कादर अशा महान विभुतींची नावे पालिका प्रशासनाने देऊन ह्या महान व्यक्तीमत्वांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पुरस्काराने सन्मानित दीपक शिरवडकर यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे केली आहे.

मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यानी सदर नावांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून डोंगरी विभागातील उपरोक्त महान विभुतींच्या कार्याचा गौरव करून त्यांची स्मृती जपावी व ती जपली जाईल अशी आशा डोंगरी सार्व.समाजसेवा प्रतिष्ठान कायदेविषयक सल्लागार दीपक शिरवडकर यानी व्यक्त केली.डोंगरी विभागातील सदर महान विभुतींची नावे "बी" विभागातील रस्त्यांना देण्याकरता माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे,आमदार नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक बळवंतराव पवार यानी पुढाकार घ्यावा अशी विनंती दीपक शिरवडकर यानी केली आहे.

 

संबंधित पोस्ट