मुंबई विमानतळावर कोरोना लस वाहतूक - व्यवस्थापनाची तयारी २४ तासांत कस्टमर केअर सेवा सुरू होणार
- by Adarsh Maharashtra
- Dec 01, 2020
- 790 views
नवी दिल्ली : चाचणीच्या निकालाच्या घोषणेसोबतच देशात कोरोना लस मिळवण्याच्या आणि ती इतर ठिकाणी पोहोचवण्याच्या तयारीला वेग आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक जे. बी. सिंह यांनी सांगितले की, ‘आमचे सर्व विमानतळ पूर्णपणे तयार आहेत. सरकारकडून निर्देश मिळताच आम्ही लसीच्या पुरवठ्याचे काम सुरू करू.’
दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘डायल’चे पीआरओ सर्वोत्तम यांनी सांगितले, ‘आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आमच्याकडे १.५ लाख मेट्रिक टन कोल्ड चेन स्टोअरेजची क्षमता आहे. मुंबई तर याबाबत दोन पावले पुढेच आहे. तेथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) लसींची वाहतूक आणि व्यवस्थापन यासाठी लवकरच एक कृती दल म्हणजे टास्क फोर्स तयार करणार आहे. हे कृती दल विमानतळ आणि ग्राहक, नियामक आणि सरकारी संस्था यांच्यात सेतूचे काम करेल.’
लोकांना सोप्या भाषेत लसीची माहिती द्यापंतप्रधानांचे ३ कंपन्यांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लस विकसित आणि उत्पादन करत असलेल्या तीन सोबत आॅनलाइन बैठक घेतली. या बैठकीत जेनोव्हा बायोफार्मा, बायोलाॅजिकल ई आणि डाॅ. रेड्डीचे प्रतिनिधी सहभागी झाले. लोकांना लसीच्या परिणामासह तिच्याशी संबंधित इतर बाबी सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी या कंपन्यांना दिला. मोदींनी लसीच्या मंजुरीशी संबंधित प्रक्रिया आणि इतर मुद्द्यांबाबत सल्ला मागितला. तसेच संबंधित विभागांना लस कंपन्यां सोबतच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले. त्यांनी लसीच्या पुरवठ्यासाठी लाॅजिस्टिक, वाहतूक आणि कोल्ड चेनच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. शनिवारीच पंतप्रधानांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट, अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक फॅसिलिटीचा दौरा करून लसीची माहिती घेतली होती.
मुंबईची तयारी २४ तासांत कस्टमर केअर सेवा सुरू होणार
कडक सुरक्षा व्यवस्थेसह कमी तापमानाच्या साठ्याचेही व्यवस्थापन करेल.नियामकीय संस्थांकडून आवश्यक मंजुरी घेऊन लसीच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी करण्या साठी काम करेल. उत्पादन स्थळापासून लोकांना लस देण्यापर्यंतच्या रस्त्यात लस घेऊन जाण्यासाठी कोल्ड चेनची व्यवस्थाही पाहील.मुंबई विमानतळावर आठवड्यातील सातही दिवस २४ तास चालणारे कस्टमर केअर सर्व्हिस सेंटरही तयार केले जाईल. या केंद्रातून भारतातून आयात-निर्यात होणाऱ्या लसीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम