गोंडपीपरी तालुक्यात रेती तस्करीचा रात्रीस खेळ चाले
कुलथा, येनबोथला, तारसा, नांदगाव फुर्डी ,घाटावरून अवैध रेती तस्करी रोजरासपणे जोमाने सुरू महसुल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
- by Reporter
- Nov 24, 2020
- 1483 views
गोंडपीपरी(प्रतिनिधी)गोंडपीपरी तालुक्यात रेती तस्कराने धुमाकूळ घातला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कुलथा, नांदगाव फुर्डी, येनबोथला, तारसा या घाटावरून रोजरासपणे अवैध रेती तस्करी जोमाने सुरू आहे. पर्यावरण विभागाने घेतलेल्या भूमिकेमुळे रेती घाटाच्या लिलावाची प्रक्रिया रखडली.त्यांमुळे बरेच रेती व्यवसायिक ह्या भागात नजरा वळवल्या असून सोईनुसार रात्रोच्या वेळेस जेसीबी,पोकलॅन्ड च्या साहाय्याने सोईस्करमार्ग करीत रेती तस्करी सुरू केली आहे.
मजुरांच्या मदतीने ट्रॅक्टर मध्ये रेती भरून घाटावर साठा केला जातो तर काही घाटावर जे. सी.बी. व पोकलॅन्ड च्या मदतीने ट्रॅक्टर मध्ये भरली जात आहे. नंतर तीच रेती जे सी बी च्या मदतीने हायवा , ट्रॅक वाहनाने वाहतुक केली जात आहे.
तारसा आणि येनबोथला घाटावर सुद्धा अश्याच प्रकारे रेती तस्करी चा रात्रोस खेळ चालत असून महसुल विभाग मात्र निद्रावस्थेत आहे.परिसरात रेती तस्करीने कळस गाठला असून घाटावर अवैध रेती चे मोठे साठे सापडले आहेत.यात मोठे अधिकारी,व्यावसायिक, राजकारणी, ट्रॅक्टर मालक सर्वांची मिलीभगत असल्याच्या चर्च ला पेव फुटले आहे.
महसुल विभागांचे रात्रौ च्या सुमारास गस्ती घालणारे ' पथक' सध्या निवांत झोपी गेले आहेत.भरदिवसा ट्रॅक, आणि हायव्हात रेती भरून वाहतूक केली जात आहे महसुल प्रशासन सदर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे महसुल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
दिवस ढवळ्या रेतीची जी वाहतूक केली जात आहे त्यात छत्तीसगड राज्यातील टी पी च्या नावाने गोंडपीपरी तालुक्यातिल रेती ची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे , त्यामुळे सदर प्रकरणात वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून गोंडपीपरी तालुक्यातील रेती तस्करी वर आळा बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रिपोर्टर