
भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली बिहारी ,पंजाबी , वाल्मिकी समाजाचे शेकडो तरुण भीम आर्मी मध्ये सामील.
ठाण्यात भीम आर्मीचा होणार भव्य मेळावा.
- by Reporter
- Nov 23, 2020
- 1557 views
मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य भीम आर्मीचा सगळ्यात मजबूत बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचे नाव सतत अग्रक्रमाने पहिल्या क्रमांकावरच असते. सर्व भाषिक-सर्व धर्माचे-सर्व जातीचे-सर्व संप्रदायाचे आणि सर्वच वर्गातील जनता दिवसेंदिवस संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांच्या असीम त्याग आणि अविरत संघर्षाने प्रेरित होऊन तसेच राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर भाई विनय रतन सिंह यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख आणि ठाणे जिल्हाप्रमुख (कार्य) भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीत सामील होत आहे.दिनांक २२ नोव्हेंबर २०२०रोजी महाराष्ट्र राज्याचे महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवा येथील अनिश जैस्वार यांच्यासह शेकडो उत्तर भारतीय तरुणांनी मोठ्या प्रमाणात भीम आर्मीमध्ये जाहीर प्रवेश केला.तसेच उल्हासनगर मध्ये पंजाबी समुदायाचे नेते मा.हरजितसिंह लबाना यांच्यासह शेकडो पंजाबी तरुण तसेच मा.किशोरभाई चव्हाण , चंडालिया साहेब यांच्यासह वाल्मिकी समाजाच्या शेकडो तरुणांनी भीम आर्मीमध्ये जाहीर प्रवेश केला.ह्यावेळी भिमपँथर मा.राजेश गवळी व महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांना भीम आर्मीच्या ध्येय धोरणाची माहिती देऊन संविधान गौरव दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या माझे संविधान माझे अधिकार ह्या उपक्रमांतर्गत सशक्त भारत-जातीमुक्त भारत ह्या अभियानाची माहिती दिली.
ह्यावेळी भिमपँथर मा.राजेश गवळी, सुनीलभाऊ गायकवाड यांचेसह उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी , ठाणे जिल्हा महासचिव मा.विजयकुमार गरुड , शहर महासचिव मा.जीवनभाई सुरडकर , मुंबई प्रदेशचे मा.किसनभाई ओव्हाळ , राहुलभाई कांबळे , शंकरराव कांबळे , नंदुभाई काळुंके , नानासाहेब वानखेडे , सुरेशजी राणे , अनिलजी महाजन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती ठाणे जिल्हा सचिव मा.ज्योतिताई भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.तसेच नवनियुक्त सर्वच पदाधिकाऱ्यांना भीम आर्मी ठाणे जिल्ह्याच्या होणाऱ्या भव्य मेळाव्यात नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा ज्योतिताई भोसले यांनी दिली आहे.
रिपोर्टर