मुंबई पालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद.. ७१३ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या , तीन शिक्षक पॉजिटीव्ह
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2020
- 1689 views
मुंबई - दि २३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु केल्या जाणार असल्याने मुंबई महापालिकेच्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. गेल्या आठवडाभरात मुंबई महापालिकेच्या ७१३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र मुंबईत आता ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याने शिक्षकांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा कोरोना चाचण्या कराव्या लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात आणि मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यासाठी मार्च पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होतील, अशी घोषणा केली होती. मात्र देशभरात वाढणारे रुग्ण, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा सुरू होणार नसल्याचा निर्णय घेतला.
पालिका आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करणार नाही, असा निर्णय घेतला असला तरी २३ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली होती. गेल्या आठवडाभरात ७१३ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७१० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर ३ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
मुंबई महापालिकेच्या ११८७ शाळा आहेत. त्यात २ लाख ९६ हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर १० हजार ८९४ शिक्षक शिक्षण देण्याचे काम करत आहेत. खासगी प्राथमिक अनुदानित व विना-अनुदानित २५९६ शाळा आहेत. त्यात ७ लाख९६ हजार ८१४ विद्यार्थी शिक्षण घेत असून २३ हजार४४९ शिक्षक शिक्षण देण्याचे काम करत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम