आरोग्य तपासणी शिबिराकडे भं.तळोधी वासीयांनी फिरवली पाठ

गोंडपीपरी(प्रतिनिधी) दि २१ नोव्हेंबरला  गोंडपीपरी तालुक्यातील भं. तळोधी येथील जि. प. प्राथ.शाळेत आरोग्य विभाग गोंडपिपरी तथा प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी आयोजीत केली होती.                             

भं.तळोधी या गावात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच गावातील कोरोना बाधीत रुग्ण दगावत असल्याच्या निकषाने गावात कोरोना बाबतीत जनजागृती आणि कोरोना चाचणी अहवाल घेण्या करिता आरोग्य तपासणी शिबिराचे  आयोजन करण्यात आले.                         

शिबिरात दहा व्यक्तींची चाचणी करण्यात आली त्यामध्ये दोन व्यक्ती कोरोना पाँझीटीव आढळुन आले. गावातील लोकसंख्येच्या      तुलनेत शिबिराला अतिअल्प प्रतिसाद        जनतेकडुन मिळाला आणि  शिबिराला गावातील बऱ्याच लोकांनी विरोध देखील केला असल्याने आरोग्य कर्मचार्यांना पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी लागली.

गावातील बहुतांश लोकांना कोरोना  विषाणुची लागण झालेली आहे.परंतु चाचणी करुन घेण्याकरिता कुणी तयार नसल्याने बाधितांची नावे समोर येत नाही .                               

स्थानिक शासकिय आयुष रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाँ.अतकरी  यांचेकडुन अधिक माहिती जाणुन घेतली असता गावात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असुन आत्तापर्यंत विस व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे अहवाला दरम्यान समोर आले आहे.कोरोना विषानुच्या संदर्भात लोकांचा अज्ञान व गैरसमज त्याच प्रमाणे शासन स्तरावरील नियमांची पायमल्ली करणे आयोजीत आरोग्य तपासणीला प्रतिसाद न देणे यामुळे कोरोना विषाणुच्या प्रसाराला वाव मिळतो.

संबंधित पोस्ट