
कोरोनाकाळात झेंडे फडकविणाऱ्यांना महाराष्ट्राची स्मशानभूमी करायची आहे काय?
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2020
- 889 views
मुंबई(प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे वडिलकिच्या नात्याने देशवासियांना काळजी घेण्याचे आवाहन सातत्याने करीत आहेत. तर दुसरीकडे सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही करीत आहेत. राज्य शासन रयतेची काळजी घेत आहे,पण राज्यात गुडघ्याला बाशिगं बांधून वावरणारी काही मंडळी लोकनियुक्त राज्य सरकार अस्थिर करण्याचा,पालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न बघत जागोजागी विनाकारण कोरोना काळात आंदोलने करीत दस्तुरखुद्द पंतप्रधानांच्या आवाहनाची एैशीतैशी करत राजसत्ता मिळविण्याकरता भक्तांना वेठीस धरून आंदोलने करीत येनकेन प्रकारेन राज्याची कायदा-सुव्यवस्था अस्थिर करण्याचा,कोरोना कसा वाढेल याकरता प्रयत्न करीत आहेत ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये राज्याला स्मशानभूमीची अवकळा येऊ नये याकरता सत्तेसाठी आतुर झालेल्यांनी सहकार्य करायचे की राज्यात विनाकारण अराजकता निर्माण करून जनतेला मृत्यूच्या दारात ओढायचे असे ठरविले आहे काय असा संतापजनक सवाल बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केला.
आज राज्यात देवळे उघडा म्हणून आंदोलने केली.आंदोलने करणारे जेथे वास्तव्यास आहेत तेथील किती मंदिरात नियमितपणे जातात,वास्तव्यास असणाऱ्या परिसरात किती मंदिरे आहेत, त्या मंदिरांची काय अवस्था आहे. याची माहिती घेतात काय?हा संशोधनाचा विषय आहे. वीज बिल माफी,जमिन खरेदी व्यवहार,कांजूर मार्ग लोकोशेड,साधूंवरील हल्ला,सुशांतचा मृत्यू, मुंबईला पी.ओ.के म्हणणाऱ्यांची पाठराखण करणे,आत्महत्येस कारण ठरलेल्याची पाठराखण करणे,एका मराठी विधवा महिलेस न्याय मिळू नये म्हणून प्रयत्न करणे,मुंबई पोलिसांच्या कर्तबगारीवर अविश्वास दाखविणे,कोरोनाच्या संकटात भाबड्या भक्तांना वेठीस धरणे,नितिमुल्ये पायदळी तुडवत अपप्रचार करणे,विनाकारण राजभवनाला अडचणीत आणणे,दस्तुरखुद्द पंतप्रधानांच्या आवाहनाला पाने पुसणे असा, प्रसिद्धीकरता व सत्तेकरता सारा खटाटोप करून उपाशी पोटी असणाऱ्या स्वभक्तांची माथी भरल्या पोटी असणारे राजकारणी विनाकारण भडकवित आहेत.सत्ता लोलूप राजकारण्यांच्या नादाला लागून भाबडे भक्तही स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला कोरोनाच्या दारात नेऊन उभे करीत आहेत हे दुर्भाग्यच!
देशासह राज्यात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे,ती परिस्थिती सुधारत असताना सबुरीचे धोरण अंगिकारण्यापेक्षा अध्यात्माच्या नावाखाली नको ती बेगडी आंदोलने करून पंतप्रधानांच्याच आवाहनास हरताळ फासण्याचे जे प्रयोजन काही मंडळी डबडी वाजवून करीत आहेत त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आज सारा देश कोरोनाने होरपळला आहे.रोजगार बुडाले आहेत ही वस्तू:स्थिती आहे.आंदोलन करणारे बरेच नेते गडगंज आहेत.त्यांनी स्वसंपत्तीतील पेलाभर संपत्तीचे वाटप भक्तांसाठी केल्याचे दिसत नाही. केवळ अंगावर उपरणे घातले अन कपाळाला टिके लावले म्हणजे आधात्म नाही. तर रंजल्या-गांजलेल्यांना स्वखिशातून मदतीचा हात देणे हीच खरी देवभक्ती व आध्यात्मिक वृत्ती आहे.सर्वसामान्य जनता अज्ञानी नाही याचे भान विनाकारणची आंदोलने करणाऱ्यांनी जरी ठेवले तरी अशी विनाकारणची आंदोलने करण्याची गरज भासणार नाही असे दीपक शिरवडकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम