
"बी" विभागात पालिका अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे वीज व पाणी माफिया सक्रीय
- by Reporter
- Nov 19, 2020
- 1332 views
मुंबई(प्रतिनिधी) : महापालिका "बी" विभागातील सहाय्यक अभियंता (परि.),सहाय्यक अभियंता(जल) विभागाच्या खाबुगिरी धोरणामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी व पाणी चोरी होत असून वीज व पाणी चोरी माफिया मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. वीज चोरी व पाणी चोरी करणाऱ्यांकडून "हप्ते" वसुलण्याकरता काही खासगी माणसे नेमली असल्याचे समजते.
पालिका "बी" विभागात नंदलाल जानी मार्ग,माधवराव रोकडे मार्ग,नागदेवी स्ट्रीट,अब्दुल रेहमान स्ट्रीट, संत तुकाराम रोड,क्लाईव्ह रोड,वाडिबंदर,एलफिन्स्टन क्रॉस लेन,प्रा.शेख हसन मार्ग,महमद अली रोड,युसुफ मेहेरअली,सँम्युअल स्ट्रीट, इटोला स्ट्रीट, मृदंगाचार्य नारायण कोळी मार्ग अभेचंद गांधी मार्ग,नरसी नाथा स्ट्रीट, एस.व्ही.पी.रोड,डॉ.मैशेरी रोड आदी मार्गांवर बेकायदापणे अतिक्रमण करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते. पालिकेच्या जे.बी.शहा मंडईतूनही वीज चोरी होतानाचे दृश्य पहायला मिळते.ह्या वीजचोरीस बेस्ट प्रशासनाबरोबरच पालिका "बी" विभागातील काही अधिकारीही जबाबदार आहेत.
वीज चोरीप्रमाणेच पालिका जलवाहिन्या फोडून पाणी चोरी करणारे माफियाही या प्रमाणात पावलोगणिक आहेत. एखादी शॉर्ट सर्किटसारखी दुर्घटना घडण्यास जबाबदार कोण?असा सवाल या विभागात विचारला जात आहे. प्रशासनाच्या खाबुगिरीपायी सर्वसामान्य हताश आहेत.प्रभागातील वीज चोरी,पाणी चोरी रोखण्याकामी भरारी पथके,दक्षता विभाग दुर्लक्ष का करते याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर