जनतेनं वीज बिलं भरू नयेत, ५० टक्के सवलतीचा निर्णय कुणी रद्द केला ?

नांदेड : राज्यातील वीज ग्राहकांना ठाकरे सरकारने सक्तीने बिल भरण्याचा शॉक दिल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. त्यामुळे वीजबिल माफीची अपेक्षा धरणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. ऊर्जामंत्र्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी सरकार विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. जनेतनं विज बिलं भरू नयेत, असे आवाहन करताना, विज बिल न भरल्यास ५० टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला. आंबेडकर यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील जनतेला बिलं न भरण्याचं सूचवलं आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले की, ऊर्जामंत्रीनितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ, सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशाप्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल, आम्ही वीज बिलं भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ, रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट