
"बी" विभागात बेकायदा इमारतीस आग भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणाचाच नाही धाक
इमारत व कारखाने विभागाचा अधिकाऱ्याचा भष्टाचार चव्हाट्यावर
- by Reporter
- Nov 15, 2020
- 1948 views
मुंबई(प्रतिनिधी): मुंबई महापालिका "बी" विभागातील अधिकाऱ्यांच्या "भ्रष्ट" कारभारामुळे स्थानिकांचे जीवन धोक्यात आले असून एैन दिवाळीत या प्रभागातील १७/१९ व १९/२३ काझी सैय्यद स्ट्रीट या दोन बेकायदा इमारती उभारलेल्या ५ मजली इमारतीस आज पहाटे शॉर्ट-सर्किटमुळे दुसऱ्या मजल्यावर आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाडयानी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
सदरहू इमारत सहाय्यक आयुक्त-बी श्रीनिवास किलजे असताना झाली असून ह्या ५ मजली बेकायदा इमारतीस सर्व नागरी सुविधा म्हणजे वीज-पाणी-मल:निस्सारण सुविधा लक्ष्मीबंधनात अडकून दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यासाऱ्या सुविधा रात्रीच्या काळोखात कामे करून पुरविल्या जातात.बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याएैवजी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करत मानवतेच्या गोंडस नावाखाली नागरी सुविधा बेकायदा ठिकाणी पुरवितात.
पालिका "बी" विभागात इमारती कोसळणे आगी लागणे हे नित्याचे प्रकार झाले आहेत ज्या पालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम आढळेल तेथील पालिका-पोलीस अधिकारी, लोकसेवक यांच्यावर कारवाई केली जाईल असे सूतोवाच राज्याच्या विधानसभेत वेळोवेळी केले गेले आहे. पण त्याची अम्मलबजावणी मात्र होताना दिसत नाही. विशेष म्हणजे पाच-दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती कोसळताच कशा?त्यांना आगी लागताचच कशा?हा प्रश्न आहे. इमारत व कारखाने विभागात गलेलठ्ठ पगारावर असणारे मुकादम, कनिष्ठ अभियंते,दुय्यम अभियंते, सहाय्यक अभियंते प्रभागातील घडामोडीचा दररोजचा लेखी अहवाल वरिष्ठांना देतच नाहीत. वरिष्ठ ही मधुर संबंधामुळे विचारत नाहीत. सारा आलबेल व रामभरोसे कारभार पहायला मिळतो. पालिका "बी" विभागातील आग लागलेला रेडिमेडचा कारखाना पण
कोणत्याही शासनाच्या परवानगी नाहीत.यांच इमारतीत बेकायदा सिल्व्हर मून लॉज हा बेकायदेशीर चालविला जात असताना याकडे प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याचे लक्ष जावू नये,याचाच अर्थ बेकायदापणा करणाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध किती दांडगे आहेत ही बाब समोर येते.
पालिका बी विभागात डॉ.मैशेरी रोड,नवरोजी हिल रोड,सामंतभाई नानजी मार्ग,इसाजी स्ट्रीट, जे.बी.शहा मार्ग,नरसी नाथा स्ट्रीट, सैय्यद मुक्री मार्ग,केशवजी नाईक रोड आदी मार्गांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती प्रशासनाच्या आशिर्वादाने उभ्या राहिल्या आहेत व रहात आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना तेथे नागरी सुविधा बेकायदेपणे पुरविल्या जात आहेत. बी विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी तर सिमेंट काँक्रीटचा रस्ता पालिका आयुक्तांची परवानगी न घेताच रात्रीच्या काळोखात खोदून बेकायदापणे पाण्याची कनेक्शन देण्याचे प्रताप केले आहेत. सद्या तर "बी" विभागास पूर्णवेळ सहाय्यक आयुक्तच नाही.आता पालिका आयुक्त कार्यवाहीचे जुजबी आदेश काढतील बस!
रिपोर्टर