पुणे पदवीधर मतदारसंघातून जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षातर्फे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर…
- by Adarsh Maharashtra
- Nov 10, 2020
- 1796 views
मुंबई दि. १० : जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे वतीने विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे वतीने राष्ट्रीय महासचिव बी.जी. कोळसे पाटील, राज्य प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, कार्याध्यक्ष रेवण भोसले, उपाध्यक्ष डॉ. पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही उमेदवारी जाहीर केली आहे…
मा. प्रा. शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदारसंघांतून दोन वेळा निवडून आले होते. तसेच विधानपरिषदेवर इ. स. २००२ मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघांतून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी होणा-या पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये प्रा. शरद पाटील यांना पदवीधर मतदारांनी क्रमांक १ चे मत देऊन पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन पक्षाचे वतीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनीही प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन या नेत्यांनी जनता दलाच्या वतीने केले आहे…
प्रा. शरद पाटील यांना विधानसभा १० वर्षे व विधान परिषद ६ वर्षे याप्रमाणे दीर्घ अनुभव आहे. विधानपरिषद सदस्य व जनता दल प्रदेश अध्यक्ष या नात्याने पुणे पदवीधर मतदारसंघात ते सुपरिचित आहेत. प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस अनेक पुरोगामी व लोकशाही पक्ष व संघटनांकडून पाठींबा मिळत आहे अशीही माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे…
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम