जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळेत शिक्षक नेमताना TET अनिवार्य करा आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समिती चंद्रपूरची मागणी

चंद्रपूर(प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळेमध्ये मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नेमताना केवळ TET आणि CTET धारक उमेदवार नेमणे अनिवार्य करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समितीद्वारे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. संजय डोर्लीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

“राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनांक २९ जुलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ली ते ८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) TET अनिवार्य केली आहे. प्राथमिक, माध्यमिक, अनुदानित, विना अनुदानित, खाजगी कॉन्व्हेंट शाळा, खाजगी CBSE शाळा तसेच कायम विना अनुदानीत अशा सर्वच शाळांतील शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य राहणार आहे, असे शासनाचे सक्त आदेश आहे.

तरीही हा आदेश झुगारून काही खाजगी शाळांमध्ये TET पास नसणाऱ्या उमेदवारांना मानधन तत्वांवर शिक्षक म्हणून रुजू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून, गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत, यासाठी जि. परिषदेतर्फे आदेश काढून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये tet धारक शिक्षकांचीच निवड करावी असा, संस्थाचालकांना आदेश द्यावा, असे निवेदन आ. वि. सं. कृती समितीतर्फे शिक्षणाधिकारी साहेबाना देण्यात आले आहे. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष शुभम उईके, सुरज निमसरकार, नितेश जुनघरे, पुरुषोत्तम मसराम उपस्थित होते

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट