बाबासाहेबांचा शाळा प्रवेशदिन राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा.
भिम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांचे राष्ट्रपती आणि प्रधानमत्र्यांना आवाहन.
- by Adarsh Maharashtra
- Nov 06, 2020
- 783 views
मुंबई(प्रतिनिधी) ज्या पद्धतीने आपण संपूर्ण देशात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हा दिवस साजरा करतो,त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देतो, त्याच पद्धतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेशदिन हा राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करून बाबासाहेबांच्या जीवनाचा संघर्ष अतपासून ते इतिपर्यंत भारतीय विद्यार्थ्यांना समजावून सांगणे अत्यावश्यक असून ह्यातूनच प्रेरणा घेऊन उद्याची सुज्ञानवादी पिढी तयार होईल , म्हणून महाराष्ट्र सरकारने २०१७ पासून राज्यपातळीवर ०७ नोव्हेंबर हा महान दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करीत आहेत , त्याच धर्तीवर केंद्र सरकारने सुद्धा ०७ नोव्हेंबर हा दिवस मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर आवाहन भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी भारताचे सन्माननीय राष्ट्रपती तसेच माननीय प्रधानमत्र्यांना ट्विटरद्वारे नि एका पत्राद्वारे केले आहे.
हजारो वर्षापासून चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा , मानवी समाजाला घातक असणारी अंधश्रद्धा , मानवामानवातील हीन असमानता आणि ह्या मानवी गुलामगिरीच्या बेड्या तोडून ज्यांनी सर्वांना समतेच्या एका सूत्रात बांधून समान दर्जा दिला , ज्यांनी विश्वातील सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था भारताला दिली त्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ०७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत पहिलं पाऊल टाकलं , तोच महान दिवस भारत सरकारने राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर आवाहन भिमपँथर मा.राजेश गवळी ह्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रपती आणि प्रधानमत्र्यांना केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम