पालिकेच्या अभय योजनेला आता मार्च पर्यंत मुदतवाढ स्थायी समितीचा निर्णय
- by Adarsh Maharashtra
- Nov 06, 2020
- 859 views
मुंबई दि,६ : मुंबई महापालिकेच्या थकीत जलदेयकांवर आकारण्यात येणारी अतिरिक्त आकाराची पुनर्रचना करून आलेला अधिभार न लावण्यात येणारी अभय योजना येत्या डिसेम्बरपर्यंत पर्यंत वाढवण्यात येण्यात होती मात्र स्थायी समिती सदस्यांच्या मागणीवरून आता हि मुदतवाढ योजना मार्च पर्यंत देण्याचा निर्णय आज स्थायी समिती झाला .
काँग्रेसचे रवि राजा यांनी आज स्थायी समिती सभेत हि मुदतवाढ योजना मार्च पर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली . ते पुढे म्हणाले कि बऱ्याच ठिकाणी लोकांपर्यंत पाण्याचे बिल अजूनपर्यंत पोहोचले नाही , त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली तर राष्ट्रवादीच्या राखी जाधव म्हणाल्या कि , मुंबई शहरातील बऱ्याच सोसायट्या हि योजना घेण्याच्या इच्छुक आहेत मात्र कमी वेळेअभावी त्यांना हा लाभ घेता येत नाही जर जास्त सोसायट्यानी या योजनेत भाग घेतला तर पालिकेला चांगला महसूल मिळू शकेल सध्या लोकांकडे पैसे नाहीत त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी उपसूचना मांडली .
मागील वर्षी १६ सप्टेंबर २०१९ रोजी अभय योजना एकूण ९० दिवसांकरिता राबविण्यास मंजुरी प्राप्त झाली होती . हा कालावधी १५ फेब्रुवारी २०२० ते १४ मे २०२० पर्यंत लागू करण्यात आली होती , दरम्यान जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रतिबंधात्मक योजना म्हणून केंद्र शासनाने व राज्य शासनाने २२ मार्च पासून देशभरात लोकडाऊन जरी केला होता मनपा क्षेत्रात हा लोकडाऊन ३१ जुलैपर्यंत सुरु होता व नंतर तो टप्याटप्याने शिथिल करण्यात आला होता
या योजनेचा मूळ हेतू नागरी सुविधा केंद्र लोकडाऊनच्या कालावधीत बंद असल्यामुळे तसेच सर्व कामकाजावर बंदी असल्यामुळे साध्य झाला नव्हता , त्यामुळे महापालिकेने मंजूर व लागू केलेली अभय योज़न दोनवेळा १५ मे २०२० ते १२ ऑगस्ट २०२० पर्यंत व १३ १३ ऑगस्ट ते ३१ डिसेम्बर २०२०२ पर्यंत पालिका आयुक्तांच्या मंजुरीने वाढवण्यात आली होती . त्यामुळे सादर अभय योजनेचा कालावधी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे वाढवण्याकत आला आहे . त्यामुळे या कालावधीसाठी जलदेयकांवर कोणतेही अधिभार लावण्यात येणार नाही .

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम