कोरोना पार्श्वभूमीवर मुंबईतील चैत्यभूमी (स्मारक) येथे अनुयायांनी गर्दी न करता यंदाचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक व स्थानिक स्तरावर पाळावा!
- by Adarsh Maharashtra
- Nov 06, 2020
- 1498 views
मुंबई (जीवन तांबे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त दादर येथील चैत्यभूमीवर देशाच्या कोनाकोप-यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात.
यंदा कोरोना पादुर्भाव लक्षात घेऊन तमाम अनुयायांनी कोरोनाला रोखण्याकरिता मुंबईत चैत्यभूमी येथे गर्दी करु नये असे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती ने आंबेडकर अनुयायांना केले आहे.
मार्च महिन्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव देशात होऊ लागल्यानंतर बौध्द बांधवांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ता. १४ एप्रिल रोजी अत्यंत साधेपणाने व घरच्या घरीच साजरी केली.
कोरोनाचा धोका, त्याची तीव्रता पाहता सर्व नागरिकांनी हा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.
महापरिनिर्वाण दिना निमित्त दरवर्षी चैत्य भूमीवर परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेण्याकरिता लाखो संख्येने अनुयायी येतात.
यंदाची परिस्थिती वेगळी आहे. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी साधेपणाने, घरच्या घरी परमपूज्य बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण सर्वांनी केले, त्याच पध्दतीने पुन्हा महापरिनिर्वाण दिनी देखील विविध भागातून दरवर्षी येणा-या अनुयायांनी यंदा मुंबईत शक्यतो गर्दी करु नये. जर अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईत आले तर गर्दी होऊन कोरोना संसर्ग फैलावू शकतो.
अनुयायांमध्ये आबालवृध्दांची संख्या मोठी असते. कोरोना विषाणूचा धोका अशा वयो गटातील व्यक्तींना पोहोचू शकतो. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेऊन सरकारचे नियम
सर्व नियमाचे पालन करुन महापरिनिर्वाण दिन पाळावा, अशी विनम्र विनंती समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्यावतीने चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनी शासकीय मानवंदना देण्यात यावी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात यावी, मानवंदना कार्यक्रमाचे देशभरात थेट प्रसारण तसेच चैत्यभूमीचे ऑनलाईन दर्शन करण्यात यावे.
अशी विनंती समन्वय समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्य शासनाला करण्यात आली आहे. याचीही तमाम अनुयायांनी नोंद घ्यावी, असे आव्हान समन्वय समितीक कळविण्यात आले आहे.
भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदन्त-शांतीरत्न, भदन्त-करूणानंद थेरो, भदन्त आर्यनाग अत्नदर्शी व समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम