अमिताभ बच्चन आणि सोनी वाहिनीला भिम आर्मीचे जाहीर समर्थन.
एक सत्य प्रश्न विचारला तर इतकं झोंबलं , आता आम्ही आमचा पूर्ण सत्य इतिहास जगासमोर मांडला तर नफरतखोरांची काय स्थिती होईल ?
- by Adarsh Maharashtra
- Nov 04, 2020
- 904 views
मुंबई (प्रतिनिधी) प्रचंड लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असणारी सोनी टीव्ही वरील प्रश्नमंजुषावर आधारित कौन बनेगा करोडपती ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून , ह्या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सध्याच्या भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक असणारे अमिताभ बच्चन यांचे प्रभावी धारदार सूत्रसंचालन असून ह्या मालिकेत विचारले जाणारे प्रश्न सुद्धा निश्चितपणे प्रेक्षकांची ज्ञानलालसा भागवत असते ह्यात काहीच शंका नाही.सध्या चालू असलेल्या ह्या मालिकेत अमिताभ यांनी ६ वा प्रश्न विचारला की २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व त्यांच्या अनुयायांनी कोणता धार्मिक ग्रंथ जाळला होता ? आणि ह्या प्रश्नाला त्यांनी नेहमीप्रमाणे चार पर्याय (ऑप्शन) सुद्धा दिले की
१】 विष्णूपुराण
२ 】 भगवदगीता ,
३ 】 ऋग्वेद
४ 】 मनुस्मृती आणि हॉटसीट वरील उत्तरकर्त्याने उत्तर दिले की , २५ डिसेंबर १९२७ रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली.उत्तर बरोबर होते , कारण तो सत्य इतिहास आहे.पण इथेच नफरतखोरांच्या बुडाला आग लागली आणि त्यांनी अमिताभ बच्चन तसेच सोनी टीव्हीच्या विरोधात आकांडतांडव करावयास सुरुवात केली. काय चूक होती ह्या प्रश्नात ? आजकाल ह्या देशात सत्य प्रश्न विचारणे सुद्धा गुन्हा ठरवल्या जातोय का ? असा संतप्त सवाल भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
केवळ एका सत्य प्रश्नाने जर इथले नफरतखोर सैरभैर होत असतील तर आम्ही आमचा संपूर्ण सत्य इतिहास जगासमोर मांडायला सुरुवात केली तर काय होईल ? असे अशोकभाऊंनी ठणकावले असतानाच भिम आर्मी संपूर्णपणे अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून भिम आर्मी नेहमीच सत्याची आग्रही राहिली असून आता आम्हाला आमचा सत्य इतिहास सांगण्यापासून , लिहिन्यापासून आणि बोलण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असा खणखणीत इशारा अशोकभाऊ कांबळे यांनी दिला आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम