बंदर व गोदी कामगारांना बोनस जाहिर

मुंबई :भारतातील प्रमुख बंदरातील  २५९३९ बंदर व गोदी कामगारांना २०१९ - २० या  वर्षाकरिता प्रचलित योजनेनुसार  बोनस देण्याचे आदेश केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सचिव श्री. राजीव नयन यांनी आज सर्व  पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षना दिले आहेत.  बंदर व गोदी कामगारांना बोनस देण्याची मागणी अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे( कामगार ) अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये व जनरल सेक्रेटरी श्री. सुधाकर अपराज यांनी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडे केली होती.

केंद्रीय नौकानयन मंत्रालय व इंडियन पोर्ट असोसिएशनच्या आदेशानुसार मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना १९.०४ टक्के म्हणजेच १५९९४ रुपये बोनस ( पी. एल. आर. ) मिळणार आहे. बोनस देण्यासाठी पगाराची मर्यादा ७ हजार रुपये असेल.

मुंबई बंदराप्रमाणे इतर बंदरामधील  परादीप २० टक्के, विशाखापटणंम १८.१६ टक्के, चेन्नई १७. २७ टक्के, व्ही. ओ. चिदम्बरम १७. ५१ टक्के, कोचीन १९.५५ टक्के, न्यू मेंग्लोर  १६.९५ टक्के, मार्मगोवा १४.४९ टक्के, जे. एन. पी. टी. १५.७४ टक्के, दीनदयाळ २० टक्के याप्रमाणे बोनस मिळणार आहे. मुंबई बंदरात ६४३० कामगार असून त्यांना बोनस वाटण्यासाठी  १० कोटी २८ लाख रुपये खर्च येईल तर भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना बोनस वाटण्यासाठी पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाला ४० कोटी ९ लाख रुपये खर्च येणार आहे. असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख श्री. मारुती विश्वासराव यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट