सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार- ॲड.यशोमती ठाकूर
- by Adarsh Maharashtra
- Nov 03, 2020
- 904 views
मुंबई, दि. ३ : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एल. आय.सी. योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत ॲड.ठाकूर बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एल आय सी चे अधिकारी उपस्थित होते.
ॲड. ठाकूर म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती,राजीनामा मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एल.आय.सी. योजनेतंर्गत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या वर्षांत ९०० प्रकरणे आली होती. यापैकी ८७५ प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे त्रृटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ॲड.ठाकूर यांनी सांगितले.
एल आय सी मार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची ६५ वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या सेविकांच्या वारसदारांसही एवढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ७५ हजार रु. रक्कम देण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम