लोणी-देवकर औद्योगिक क्षेत्रात नवस्थापित कंपनीबाबत बैठक
- by Adarsh Maharashtra
- Nov 03, 2020
- 850 views
मुंबई, दि. 3 : इंदापूर तालुक्यातील लोणी - देवकर औद्योगिक क्षेत्रात नव्याने सुरू होणाऱ्या ‘Certoplast India Pvt.Ltd.’ या कंपनीच्या स्थापनेबाबत उद्योग राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस वने राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मुकादम, प्रादेशिक अधिकारी श्री संजीव देशमुख हे दुरदृश्य प्रणालीद्वारे व उद्योग संचालनालायचे सह सचिव श्री संजय देगावकर व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, वन पाइंट विंडो अंतर्गत राज्यात देश-विदेशातून येत्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्याअनुषंगाने होणाऱ्या कायदेशीर बाबी तपासून विभागामार्फत कार्यवाही जलद करण्यात यावी.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, औद्योगिक दृष्ट्या अनुकूल वातावरण असलेल्या इंदापूर औद्योगिक क्षेत्रात देश-विदेशातून येणाऱ्या नव्या कंपन्यांचे नेहमीच स्वागत असेल. त्यातून या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असेही श्री.भरणे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील औद्योगिक क्षेत्रात चार टप्प्यात स्थापण्यात येणाऱ्या या कंपनीमार्फत सुमारे दीडशे करोड रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून जवळपास पाचशेहून अधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम