गोंडपिपरीत सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू करा,गोंडपिपरी यंग ब्रिगेड ची मागणी
- by Adarsh Maharashtra
- Nov 03, 2020
- 1067 views
गोंडपीपरी(प्रतिनिधी) गोंडपिपरी तालुक्यात कापूस आणि धान याचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे अशातच तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागात असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. या सोबतच यंदाचे वर्ष बळीराजाची परीक्षा पाहणारे ठरले आहेत अस्मानी-सुलतानी अशी दोन्ही संकटांना झेलत शेतकरी हवालदिल झाला आहे .असे असताना गोंडपिपरी तालुक्यात आता पीक हाती येऊ लागले आहेत अशातच मात्र गोंडपिपरी तालुक्यात असलेल्या चार कापूस खरेदी केंद्र पैकी एकाही केंद्राला सीसीआयची मान्यता देण्यात आली नाही यामुळे पांढरे सोने असलेल्या कापसाला खाजगी व्यापारी मिळेल त्या भावात घेत आहेत यामुळे बळीराजा यांची आर्थिक पिळवणूक होत आहेत या सोबतच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील 25 धान खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे यात मात्र गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नसल्याचे चिन्ह आहे .कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर हा अन्याय असून गोंडपिपरी तालुक्यात सीसीआयची खरेदी कापूस खरेदी केंद्र यासह धानाचे अधिकृत खरेदी केंद्र गोंडपिपरी तालुक्यात देण्यात यावे अशी मागणी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार,तालुका कार्याध्यक्ष निकेश बोरकुटे,मिलिंद अलोने,विठलवाडा शाखाअध्यक्ष संतोष उराडे,तालुका सचिव प्रमोद दुर्गे,प्रसिद्धी प्रमुख गौरव घुबडे,नबात सोनटक्के,अक्षय कोहपरे,मंगेश बट्टे उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम