मिशन बिगेन अगेन राज्यशासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार,राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२ :  राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष पुर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.१५कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.यावेळी उद्योगमंत्री  सुभाष देसाई, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव श्री संजय कुमार ,एफडीआय शेरपा  प्रधान सचिव श्री भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार  उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर  विश्वास आहे.मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत.सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमिन अधिग्रहणा सारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे कोरोना सारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आहे.

एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना  परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल.

युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत . केमिकल, डेटा यासह लाॅजिस्टिक , मॅनिफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे.

औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याला उद्योजगांचे प्राधान्य:- उद्योग मंत्री सुभाष देसाई

यु के, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणूकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. श्री. देसाई पुढे म्हणाले, डेटा सेंटर, लाॅजिस्टिक पार्क, मॅनिफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा उंचावणार-राज्य मंत्री कु. अदिती तटकरे

आज झालेले सामंजस्य करार म्हणजे आमची धोरणे, कौशल्य, पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणांची आमची वचनबद्धता आणि या सगळ्यापलीकडे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांशी असलेले आमचे संबंध यांचे चांगले फळ आहे. भविष्यातही महाराष्ट्र राज्यात अनेक नवीन गुंतवणूकदारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळेल असा विश्वास उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करतांना व्यक्त केला.

सामंजस्य करार स्वाक्षरी सोहळा कंपन्यांची संक्षिप्त माहिती

अ.क्र नाव देश क्षेत्र प्रस्तावित
गुंतवणूक
(रु. कोटीमध्ये) प्रस्तावित
रोजगार

१) मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. जपान इलेक्ट्रॉनिक्स ४९० ३५०

२) ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि. भारत इंधन तेल व वायू १,८०० १,५७५

३) ओरिएंटल ऍरोमॅटिक्स भारत रसायने २६५ ३५०

४) मालपानी वेअरहाऊसिंग अँड इंडस्ट्रिअल पार्क भारत लॉजिस्टिक्स ९५० ८,०००

५) एव्हरमिंट लॉजिस्टिक्स भारत लॉजिस्टिक्स ३५४ २,१००

६) पारिबा लॉजिस्टिक्स पार्क भारत लॉजिस्टिक्स ३८१ २,२००

७ ) ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क भारत लॉजिस्टिक्स ३९५ २,२००

८) नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. भारत डेटा सेंटर १०,५५५ ५७५

९) अदानी एन्टरप्राइजेस लि. भारत डेटा सेंटर ५,००० १,०००

१०) मंत्र डेटा सेंटर स्पेन डेटा सेंटर १,१२५ ८०

११)  एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया प्रा. लि. भारत डेटा सेंटर ८२५ ८००

१२) कोल्ट (डेटा सेंटर होल्डिंग्स इंडिया एलएलपी) युके डेटा सेंटर ४,४०० १००

१३) प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप सिंगापुर डेटा सेंटर १,५०० ३००

१४) नेस्क्ट्रा भारत डेटा सेंटर २,५०० २,०००

१५) इएसआर इंडिया सिंगापुर लॉजिस्टिक्स ४,३१० १,५५२

एकूण- ३४,८५० २३,१८२

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट