उपऱ्यांसाठी बाह्या सरसावणाऱ्या मराठी भाषिकानी विचार करावा-शिरवडकर
- by Adarsh Maharashtra
- Nov 02, 2020
- 1251 views
मुंबई(प्रतिनिधी) सुशांतसिंग राजपूत व कंगणा राणावतमुळे मुंबईसह महाराष्ट्रात अडगळीत पडलेले,गल्लीतही ज्यांच्याकडे कोणी ढुंकून बघत नाहीत असे राजकारणी टिवटिव करीत,काही प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणी प्रयत्न वकिलपत्र घेतल्याप्रमाणे करीत होते आणि मुंबईसह महाराष्ट्राबद्दल कृतघ्नतेची भावना व्यक्त करीत होते.ते आज गायब झालेले दिसतात अशा फंदफितुरांना काय म्हणावे?अशी खंत डेग्निटी फौंडेशन एक्सलिन्सी पुरस्कारने सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
आता मंदिरे उघडा अशी ओरड केली जात आहे. मंदिरे उघडा म्हणणाऱ्या भक्तांना किती आरत्या पाठ आहेत. हा संशोधनाचा विषय आहे.बेळगाव सीमाप्रश्नावर विरोधाची भाषा करणारे बोलायला तयार नाहीत,अडचणीच्या प्रश्नावर,समस्यावर अळी मिळी गुपचिळी!राज्य सरकारला आव्हान देणे,म्हणजे राज्यातील तमाम जनतेचा एकप्रकारे अपमानच म्हटला पाहिजे सरकार चांगले चालले असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी भाषा फंदफितुरांसह उपऱ्यानी करावी हे मात्र अतिच झाले. प्रसिद्धी माध्यमेही मुंबईसह महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्यांना डोक्यावर का उचलून घेतात?एवढी प्रसिद्धी का देतात?खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली वारेमाप प्रसिद्धी देण्यामागे काय दडले आहे.उठसुठ प्रसिद्धी माध्यमासमोर येऊन आरडाओरडा करीत आरोप करणारे मा.न्यायालयात धाव मात्र घेताना दिसत नाहीत?मुंबईसह महाराष्ट्रात पोटाची खळगी भरायला आलेल्या पाहुण्यानी पाहुण्यासारखेच राहिले पाहिजे विनाकारण मराठी भाषिक आणि मराठी राज्यात ढवळाढवळ करू नये आणि मराठी भाषिकानी अशी केलेली ढवळाढवळ सहनही किती करावी.मुंबईसह महाराष्ट्राचा स्वाभिमान मेला का?याचे गांभिर्य कोणालाच कसे नाही? असे मत शिरवडकर यांनी व्यक्त केले.
रिया चक्रवर्ती...जुहुच्या पॉश एरियात घर,कंगणा रानौत..खारच्या पॉश एरियात घर,सुशांतची मुंबईत करोडोंची प्रॉपर्टी आणि लोणावळयात फार्म हाऊस!भक्तांची डोकी भडकावून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांची आलिशान घरे आणि डोळे दिपवणारी संपत्ती तर दुसरीकडे उपाशीपोटी बोंब मारणाऱ्या भक्तांची स्वतःची झोपडीही नाही.नोकरीही नाही. आतातर खायला अन्न मिळणे कठीण झाले आहे.भक्तगण याचा विचार कधी करणार. शहराबाहेर वसई, कल्याण, वाशी,
अंबरनाथ,पनवेल,विरार,बदलापूर,डोंबिवली ठाणे अशा भागात ईएमआयवर खरेदी केलेली घर!बँकेचे हप्ते भरायची ताकद नाही कशाला भांडताय?उपऱ्यांनी बाहेरून येऊन इथे प्रॉपर्टीज उभारल्या.आणि त्यांच्यासाठी भांडणाऱ्यानी किमान डोंबिवलीवरून दादरला घर घेण्याइतपत मजल मारुन दाखवावी.अशी खंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम