यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक लोकहितवादी मंडळ या संस्थेस जाहीर
- by Adarsh Maharashtra
- Nov 02, 2020
- 1069 views
मुंबई :यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना-व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. यंदा लोकहितवादी मंडळ या संस्थेस हे पारितोषिक जाहीर झाले आहे.
रोख रक्कम २ लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२०या दिवशी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याचे वितरण होईल. महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रातील रचनात्मक प्रेरक आणि भरीव योगदानासाठी लोकहितवादी मंडळ ही नामवंत संस्था आहे. कवि कुसुमाग्रज यांनी १९५० साली लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. मंडळाने मराठी साहित्य, भाषा, सर्व कला क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आणि नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य केले आहे. नाशिकमधील कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व या क्षेत्रातील अनेक संस्थादेखील घडविण्याचे कार्य केले आहे आणि आजही चालू आहे. या संस्थेचे दीर्घकालीन साहित्यिक आणि ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोद घ्यावी, म्हणून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, असे कळविण्यात आले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम