उल्हासनगरचे नाव देश पातळीवर झळकवणाऱ्या चित्रपट निर्मात्याचा महापौरानी सन्मान करावा .

उल्हासनगर(प्रतिनिधी) उल्हासनगरचे एक  तरूण फिल्म मेकर, उत्कृष्ट छायाचित्रकार व लघु चित्रपट निर्माते सचिन सुशील पगारे यांनी दैदिप्यमान यश मिळवून उल्हासनगर शहराचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे. त्यामुळे त्यांचा उल्हासनगर महापालिकेने गौरव करावा अशी मांगणी समाजसेवक व ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यानी महापौर लिलाबाई आशान याना केली आहे . 

त्यांनी निर्मित केलेला  सूर्य चोरलेला माणूस,हा १३  मिनिटांचा लघुपट जगभरातून आलेल्या ४५९९ लघुपटातून गेल्या महिन्यात "सूर्य चोरलेला माणूस" हा लघुपट गुजरात येथे होणा-या आंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला होता.

सदर महोत्सवात निवडला गेलेला हा लघुपट  बेस्ट  इंडियन  ड्रामा  फिल्म  म्हणून निवडला गेला आहे.  तेव्हा ही बाब उल्हासनगर करिता  आनंददायी व अभिमानास्पद असुन शहराचे नाव त्यानी आंतरराष्ट्रिय पातळीवर नेले आहे . 

गेल्या महिन्यात "सूर्य चोरलेला माणूस" या लघुपटाची निवड जाहिर होताच अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सचिन सुशील यांचा सत्कार आयोजित करून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.तर सचिनच्या लघुपटाची निवड झाल्याने उल्हासनगरकरांनी दाखवलेला विश्वास सचिन यांनी सार्थ ठरवला आहे. तेव्हा 

उल्हासनगर महापालिकेच्या  महापौर लिलाबाई आशान यानी आपल्या शहरातील एका गुणी व शहराचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणा-या युवा कलाकाराचा  योग्य तो सन्मान करावा,अशी मागणी ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यानी महापौराना केली आहे .

संबंधित पोस्ट