मुलुंडच्या प्रभाग क्र १०६ चे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना कोरोनाची लागण

मुलुंड :(शेखर भोसले) मुलुंड पूर्व, विभाग क्र १०६ चे नगरसेवक प्रभाकर शिंदे हे दि ३० ऑक्टोबरपासून त्यांची कोविड१९ ची चाचणी पॉज़िटिव आल्याने कोरोनाने आजारी असून उपचारासाठी त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची तब्येत स्थिर असून उपचाराला योग्य प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून नगरसेवक प्रभाकर शिंदे हे सतत आपल्या प्रभागात कार्यरत असून प्रभागातील नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून, गेल्या साडेसात महिन्याच्या काळात त्यांनी अनेक गोरगरीबांना, गरजूंना, मजूरांना दोन वेळच्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप केले आहेत तर कित्येकांना त्यांनी अन्नधान्य वाटप केले आहे. तसेच विभागातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, होमिओपॅथी औषध अर्सेनिक अल्बम, इत्यादींचे मोफत वाटप केले. प्रत्येक सोसायटय़ाना थर्मलगन व ऑक्सिमीटरचे वाटप केले आहे. विभागातील प्रत्येक वस्तीत, इमारतीत सॅनिटायझर फवारणी केली तर विभागातील रहिवाशांच्या सोयीसाठी मोफत आरोग्य शिबिरे आणि मोफत औषधं वाटप केले. प्रत्येक सोसायटीत व वस्त्यांमध्ये भाजीपाला विक्री केंद्रे सुरु केली तर अनेक कोरोणा रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी सहाय्य केले आहे. 

गेल्या साडेसात महिन्यांपासूनच  या कोरोनाच्या काळातही सातत्याने आपल्या प्रभागातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या नागरी समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी वेळेचे बंधन न पाळता धावून जाण्याचे महत्वपूर्ण कार्य नगरसेवक प्रभाकर शिंदे सातत्यपूर्ण करत असल्यामुळे विभागातील जनतेने देखील त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्या साठी जनतेशी, पालिका अधिकाऱयांशी त्यांचा सततचा संपर्क असायचा. प्रभागात तसेच महापालिका सभागृहात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे प्रजा फाऊंडेशनने नुकत्याच जाहिर केलेल्या श्वेतपत्रिकेत 
२०१९-२०२० सालातील पहिल्या १० उत्कृष्ट नगरसेवकांत त्यांचा समावेश झाला आहे. 

कोरोनाची लागण झाल्याने नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी एक निवेदन जाहिर केले असून त्या निवेदनात त्यांनी, "लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस मी कार्यरत होतो पण काल माझी कोविड चाचणी पॉज़िटिव आली असून मी रुग्णालयात दाखल झालो असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आणि माझ्या सहकार्यांनी लगेच कोरोणा चाचणी करून घ्यावी आणि स्वत:ची काळजी घ्यावी. लवकरच मी बरा होवून आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल", असे विनंतीपूर्वक आवाहन त्यांनी केले आहे.             

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट