
प्रथम महिला शाहिरा सीमाताई पाटील यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घरातील देव्हारे समुद्रात दिले फेकून.
भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केले जाहीर स्वागत.
- by Reporter
- Oct 30, 2020
- 2059 views
मुंबई(प्रतिनिधी) आपल्या सुरेल गळ्याने आणि धारदार पहाडी आवाजाने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतातील पहिल्या वहिल्या लोकशाहिरा तसेच आपल्या जिवंत अभिनयातून प्रेक्षकांना जागेवरच खिळवून ठेवणाऱ्या व आपल्या थेट काळजाला भिडणाऱ्या अमोघ वाणीतून समाजजागृती करण्याचे भिमव्रत हाती घेतलेल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महागायिका कंठकोकिळा आयुनि.सीमाताई पाटील यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला.ह्या ऐतिहासिक घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात , देशात उमटले असून सर्वच स्तरातून सीमाताई पाटील यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असून भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सुद्धा भिम आर्मीच्या वतीने त्यांचे जाहीर स्वागत केले आहे.
हिंदू धर्मातील अतिशय देवभोळ्या आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या गुरव पुजारी समाजात जन्मलेल्या सीमाताई पाटील ह्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार-गीतकार व गायक असणारे जॉलीदादा मोरे , डॉ.विजयकुमार गवई आणि मनोहर तायडे मामा ह्यासारख्या पुरोगामी व सुधारणावादी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर मात्र आमूलाग्र बदलल्या.ह्या थोरामोठ्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी तथागत बुद्ध , फुले , शाहू , आंबेडकरी विचार आत्मसात केल्यानंतर त्यांना साहजिकच विज्ञानवादी बौद्ध धम्माचा ध्यास लागला आणि त्यातूनच त्यांनी सुमारे २ वर्षांपूर्वी घोषणा केली की मी अज्ञानी हिंदू धर्म त्यागून विज्ञानी बौद्ध धम्माचा अंगिकार करणार आहे.आणि त्यांनी आपली ही घोषणा नुकत्याच झालेल्या अशोका विजयादशमी दिनी पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आणि आपल्या घरात असणारे सर्व देव्हारे त्यांनी चैत्यभूमीवरील समुद्रात फेकून दिले.आता थोड्याच दिवसांत त्या एका विशाल कार्यक्रमात आपल्या हजारो बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारणार असल्यामुळे भिम आर्मीच्या वतीने भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी प्रमुख मा.राजुभाई झनके , वरिष्ठ सदस्य मा.बाबा रामटेके तसेच राज्य महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सीमाताई पाटील यांचा जाहीर सत्कार शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कल्याण गेस्ट हाऊस मध्ये होणार असल्याची माहिती भिम आर्मीचे ठाणे जिल्हा महासचिव मा.विजयकुमार गरुड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.ह्या सत्कार समारंभावेळी सुप्रसिद्ध संगीतकार मा.जॉलीदादा मोरे , डॉ.विजयकुमार गवई , मनोहर तायडे मामा , भिम आर्मीचे मुंबई प्रदेश संघटक मा.किसनभाई ओव्हाळ , जिल्हा सचिव ज्योतिताई भोसले , कल्याण लोकसभा क्षेत्र महासचिव मा.रविंद्रजी साळवे , उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी , शहर महासचिव मा.जीवनभाई सुरडकर , नानासाहेब वानखेडे , अनिल महाजन , पप्पूभाई आखाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
रिपोर्टर