भाजप शिक्षक आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावर डॉ. राजू बंडगर यांची नियुक्ती जाहीर.
भारतीय जनता पक्षाची मुंबई कार्यकारणी पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार मा. श्री. मंगलप्रभाजी लोढा यांनी नुकतीच जाहीर केली.
- by Adarsh Maharashtra
- Oct 28, 2020
- 907 views
मुंबई : शिक्षणक्षेत्रात अनेक वर्षे चळवळी, आंदोलने, निदर्शने, संप अशा विविध माध्यमांतून शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे असे उच्चविद्याविभूषित डॉ. श्री. राजू बंडगर यांची भाजपा शिक्षक आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. डॉ. राजू बंडगर यांनी मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवलेली आहे. ते स्वतः लेखक असून त्यांची अनेक शैक्षणिक पुस्तके प्रकाशित आहेत.प्रहार, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे शैक्षणिक लेख प्रकाशित झालेले आहेत. शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
भारतीय जनता पक्षाने सोपवलेली ही जबाबदारी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सन्मान असून मुंबईमधील प्रत्येक शाळा - महाविद्यालयामध्ये संघटना पोहोचवण्याचे तसेच शिक्षण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक अशा सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने काम सुरू करणार असल्याचे याप्रसंगी डॉ. राजू बंडगर यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार मा. श्री. नारायणराव राणे , आमदार मा. श्री. नितेश राणे , मा. खासदार मा. श्री. निलेश राणे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने पुढील वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम