
रा.मि.म.संघाचा वर्धापनदिन ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारा !
- by Adarsh Maharashtra
- Oct 25, 2020
- 1134 views
मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७३ वा वर्धापन म्हणजे कामगार महर्षी गं.द. आंबेकर यांनी त्याग, निष्ठा आणि संघर्षातून उभ्या केलेल्या इतिहासिक कार्याला उजाळा देणारा होता !आशा शब्दात आज संघटना स्थापने मागील स्मृती जागविण्यात आल्या !
गेली पंचवीस वर्षे अध्यक्ष म्हणून सर्वाधिक नेतृत्व करणाऱ्या माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर आणि त्यांना साथ देणा ऱ्या सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रेरणेने संघटनेचा ७३ वा वर्धापन आज पूर्वसंध्येला परेलच्या मजदूर मंझील मध्ये संपन्न झाला.
खजिनदार निवृत्ती देसाई आणि उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर यांच्या हस्ते सर्वप्रथम आद्य संस्थापक स्व.गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आभिवादन करण्यात आले.
गं.द.आंबेकर यांचा स्वातंत्र्य पूर्व काळातील जन्म! बी.एससी पर्यंत प्रथम श्रेणीत शिक्षण घेतलेल्या नंतर आंबेकरजींनी नोकरी केली नाही.त्या ऐवजी १९३७ मध्ये त्याकाळच्या अहमदाबाद येथील गांधीजींच्या प्ररणेने उभ्या राहिलेल्या नामवंत हिंदुस्थान मजदूर सेवक संघाच्या कामगार प्रशिक्षणालयात तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतले.त्यांच्या बरोबर मपारा,खाडिलकर, आठवले तिघे मित्र होते. शिक्षण होताच आंबेकरांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुढाकारांने सेवाग्रामला जाऊन महात्मा गांधीजींचे मार्गदर्शन घेतले पुढे आंबेकर यांनी १९३८ मध्ये शिवडी कॉटन ग्रीन येथील कापसाच्या गोदामातील कामगारांना "कामगार सेवा संघ" स्थापन करुन संघटीत कले. त्यांना न्याय मिळवून दिला आणि कामगार कार्याला आरंभ केला.त्या नंतर होमिओपॅथीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेऊन गिरणी कामगारांची सेवा केली. त्या काळी बारा बारा तास गिरणी कामगारांना काम करावे लागे.कामा प्रमाणे पगार नव्हता.रजा नव्हती,सामाजिक हिताचे कायदे लागू नव्हते असे त्यांचे शोषण होत होते.आंबेकर यांनी १९४६ ला कामगार सेवा संघाचे नाव बदलून 'राष्ट्रीय गिरणी कामगार संघ'स्थापून कामगारांचे जटील प्रश्न हाती घेतले.
पुढे मुंबईतील स.का.पाटील आणि आंबेकर यांच्या समविचारी दोन कामगार संघटनांचे २९सप्टेंबर १९४७ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर एकत्रितकरण होऊन "राष्ट्रीय मिल मजदूर संघ"या संघटनेची स्थापना झाली.पुढे महागाई वाढीशी निगडित पगार वाढ,बोनसचा अधिकार, भरपगारी रजा आदी न्याय हक्क मिळवून देऊन कामगारांचा जीवनस्तर उंचाविला.आजच्या वर्धापनदिनी या कामांना उजाळा देण्यात आला.
खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले,आजचा भविष्य निर्वाह निधी कायदा, ग्रँच्युईटी, कामगार राज्य विमा योजना आदी सामाजिक हिताचे फायदे आंबेकरजींच्या विधायक चळवळीद्वारे मिळाले आहेत.
उपाध्यक्ष बजरंग चव्हाण म्हणाले,आंबेकर यांनी "आय.एल.ओ"मध्ये इंटकचे प्रतिनीधीत्व करून कामगारांचा आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला.स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेऊन कामगार चळवळीवर बहुआयामी व्यक्तीमत्वाची छाप उमटवली. सर्वश्री उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर,सुनिल बोरकर यांनीही आपल्या भाषणात आंबेकर जींच्या सर्वव्यापी कार्याला उजाळा दिला.या कार्यक्रमाला अध्यक्ष सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला मोजकेच प्रतिनिधी,कार्यकर्ते उपस्थित होते. त्या प्रसंगी कोरोना बाबतच्या सर्व. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम