शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं आईनं मुलीला पेन्सिलनं भोसकलं ; मुंबईतील हादरवून टाकणारी घटना...
- by Adarsh Maharashtra
- Oct 24, 2020
- 1507 views
मुंबई : ऑनलाईन वर्ग सुरू असताना शिक्षकानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही म्हणून आईनं सहावीत शिकणाऱ्या मुलीवर पेन्सिलनं वार केले.चिडलेल्या आईनं मुलीच्या पाठीत पेन्सिल भोसकलं.
त्याचबरोबर अनेकदा पेन्सिलनं वार करत मुलीला जखमी केलं.मुंबईत ही घटना घडली असून, पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. करोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत.
विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्यानं, त्याचबरोबर प्रसार होण्याच्या भीतीमुळे सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.मात्र, सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहेत. यामुळे मुलांची चिडचिड होत असल्याचं समोर येत असतानाच मुंबईत हादरवून टाकणारी घटना घडली आहे.
सहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीवर आईनं रागाच्या भरात पेन्सिलनं हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बुधवारी ही घटना घडली. ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलीला शिक्षकाने प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मुलीला देता आलं नाही. त्यामुळे तिच्या आईला याचा राग आला. संतापाच्या भरात आईनं मुलीच्या पाठीत पेन्सिल भोसकलं. त्यानंतर पेन्सिलनंच अनेक वार केले. हा सगळा प्रकार जखमी मुलीच्या मोठ्या बहिणीनं बघितला.
त्यानंतर तिने चाईल्ड हेल्पलाईनला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच स्वयंसेवी संस्थेचे दोन कार्यकर्ते मुलीच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर महिलेनं काहीच उत्तर दिलं नाही. सदरील महिलेवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम