आत्म्याला शांती मिळावी यासाठी सहा वर्षाच्या मुलाचा नरबळी, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ; सख्ख्या नातेवाईकांचा समावेश
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 871 views
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील डोळा पिंपळगाव येथील बहुचर्चित नरबळी प्रकरणात मे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कळंब तालुक्यातील पिंपळगावात २०१७ साली सहा वर्षीय कृष्णा इंगोले या चिमुकल्याचा नरबळी देण्यात आला होता.
हे प्रकरण राज्यात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. या प्रकरणात चिमुकल्याच्या सख्ख्या आत्यासह चुलता, चुलती, आजोबा आणि पुण्यातील एका मांत्रिकाला अटक करण्यात आली होती.
साडे तीन वर्षामध्ये मे.उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात विविध साक्ष, युक्तीवाद झाला. अखेर मे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी देशपांडे यांनी निकाल दिला.
काय आहे प्रकरण –
२६ जानेवारी २०१७ रोजी मयत कृष्णा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून शाळेतून त्याच्या पिंपळगाव (डोळा) येथील घरी आला. घरी आई नसल्याने तो घराबाहेर खेळत होता.मात्र नंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही तो न सापडल्याने मयत कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ च्या सुमारास शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला.याचा तपास कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक डी. डी. बनसोडे यांनी केला.
त्यानंतर हा तपास पोलीस निरिक्षक सुनिल नेवसे यांनी केला.या प्रकरणी केलेल्या तपासात मयत कृष्णाची सख्खी आत्या द्रोपदी पौळ हिने त्याला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्याला आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील विहीरीवर दाट झाडीत घेऊन गेली.
त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम