आर्थररोडच्या आईची महाअलंकार पूजा'
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 1287 views
मुंबई : महाराष्ट्रात पुरातनकाळापासून नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा करण्याची प्रथा आहे. चिंचपोकळी (पश्चिम), आर्थररोड नाका येथील आनंद इस्टेट (केरमानी बिल्डिंग) चाळीत १९८० पासून प्रतिवर्षी नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीत साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी व पुण्याची तांबडी जोगेश्वरी या देवीमातेची अलंकारपूजा बांधली जाते. त्याचे वैशिष्ट्य घेऊन मुंबईतील आर्थररोडची आईची मागील १२ वर्षांपासून महाअलंकार पूजा बांधली जात आहे. हि महाअलंकार पूजा देवीला नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या देवीच्या रूपात सजवून साकारली जाते. या पूजेच्या माध्यमातून शक्ती उपासक वेद-पुराणे भक्तांना कलेच्या माध्यमातून सहज सोप्या स्वरूपात दर्शविली जातात.
नवरात्रोत्सवात २०२० मध्ये घटस्थापनेच्या दिवशी संतानलक्ष्मी स्वरूपात देवीची महाअलंकार पूजा साकारण्यात आली. त्यानंतर कुमारी देवी, हैमवती-उमा देवी, उपांगललिता देवी, शितलादेवी, महासरस्वती देवी, महालक्ष्मी देवी, गजलक्ष्मी देवी अशा विविध रूपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येणार असून विजयादशमीच्या दिवशी आर्थररोडची आई हे मूळस्वरूप दर्शविण्यात येईल.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम