भारतातील करोनाची स्थिती, महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येतली घट....
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 1629 views
मुंबई :भारतातील करोनाची स्थिती हळूहळू सुधारते आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत देशात जी करोनारुग्णांची संख्या होती ऑक्टोबर महिन्याच्या २२ तारखेपर्यंत ही संख्या तीन लाखांनी कमी झाली आहे.
विशेष बाब ही की १७ सप्टेंबरनंतर अवघ्या पाच दिवसांनीच म्हणजेच २२ सप्टेंबरपासून करोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
२१ ऑक्टोबरला देशभरात ५६ हजार नवे करोना रुग्ण आढळले होते. तर ८० हजार रुग्ण देशभरात बरे झाले. देशभरात सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णांची म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ लाख १५ हजारांच्या आसपास आहे.
ही संख्या मागील महिन्यात १० लाखांच्या पुढे गेली होती.देशभरात करोना रुग्णांची जी संख्या कमी होते आहे त्यातले जवळपास अर्धे रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत.
मागील महिन्यात महाराष्ट्रात ३ लाख केसेस अॅक्टिव्ह होत्या जी संख्या आता १ लाख ५० हजारांवर आली आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ आंध्रप्रदेशातही करोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहण्यास मिळाली आहे. आंध्र प्रदेशातली मागील दीड महिन्यात सक्रिय रुग्णांमध्ये जवळपास ७० टक्के घट झाली आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंध्र प्रदेशात करोनाचे १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण अॅक्टिव्ह होते. आता ही संख्या कमी होऊन ३२ हजारांवर आली आहे. गेल्या आठवड्या पासून आंध्र प्रदेशात दर दिवशी पॉझिटिव्ह आढळणारे रुग्ण हे ४ हजार किंवा त्यापेक्षा कमी झाले आहेत.
कारण मागच्या आठवड्याच्या आधी १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम