४०० लोकांची सुटका, ३५०० नागरिकांचं स्थलांतर; मुंबईत मॉलला लागलेली आग १२ तासांनंतरही धुमसतीच....
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 923 views
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.गेल्या १२ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पहाटे दोनच्या सुमारास अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल स्तराची घोषणा करण्यात आली.महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे २५० जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन जवान जखमी झाले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीबाबत मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली.
सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या सुमारे ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३,५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम